Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला स्वदेशी Lava O1; किंमत फक्त ६९९९ रुपये

11

स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी लावानं बजेट सेगमेंट एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनी फक्त ६९९९ रुपयांच्या किंमतीत Lava O1 स्मार्टफोन देशात सादर केला आहे. इतकी कमी किंमत असून देखील फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळतो. चला पाहूया स्पेसिफिकेशन आणि किंमत.

Lava O1 ची किंमत

भारतात Lava O1 चा एकमेव मॉडेल आला आहे. फोनच्या ४जीबी रॅम+६४जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनची किंमत ६,९९९ रुपये आहे. मोबाइलवर ब्रँड १० टक्के सूट देत आहे. म्हणजे तुम्ही हा फक्त ६,२९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा ७ ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान खरेदीसाठी उपलब्ध होईल. तसेच फोन लाइव्हली लव्हेंडर, प्रिज्म ब्लू आणि लक्स रेड सारखे तीन कलरमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: Google ची कमाल! स्मार्टवॉचमध्ये २जीबी रॅम; इतकी आहे Google Pixel Watch 2 ची किंमत

Lava O1 चे स्पेसिफिकेशन्स

Lava O1 फोनमध्ये युजर्सना ६.५ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १६००×७२० पिक्सल रिजॉल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन देण्यात आली आहे. Lava O1 स्मार्टफोनचे डायमेंशन १६३.७ × ७५.३ × ९.३एमएम आणि वजन १९९.५ ग्रामचा आहे.

हा नवीन लावा डिवाइस अँड्रॉइड १३ वर चालतो. स्मार्टफोनमध्ये UniSoC T606 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी माली जी५७ जीपीयू मिळतो. सोबत ४जीबी रॅम+६४जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर ३जीबी एक्सटेंडेड रॅमच्या मदतीनं एकूण ७जीबी पर्यंत रॅम वाढवता येतो.

हे देखील वाचा: अनलिमिटेड ५जी डेटासह Jio चे ३ नवीन प्रीपेड प्लॅन लाँच; मोफत SonyLiv आणि Zee5 चं सब्सस्क्रिप्शनही

डिवाइसमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा AI लेन्स आणि एलईडी फ्लॅशसह मिळते. तसेच, सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पावर देण्यासाठी ५०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट मिळतो. मोबाइलमध्ये १८वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. मोबाइलमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि ३.५mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.