विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये १६२ टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी भरती; थेट मुलाखतीमधून होणार उमेदवारांची निवड

VSSC Apprentice Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने पात्र आणि इच्छुक उमेदवारांना शिकाऊ पदांच्या भरतीसाठी (Apprenticeship Recruitment 2023) मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. VSSC Apprenticeship Recruitment 2023 या संधीचा लाभ घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी थेट मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. व्हीएसएससी अप्रेंटिस भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट vssc.gov.in वर संबंधित सूचना पाहू शकतात.

पदभरतीचा तपशील :

VSSC च्या या भरती मोहिमेत एकूण १६२ पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३ रोजी

मुलाखतीची वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

मुलाखतीचा पत्ता : सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलामासेरी, एर्नाकुलम, केरळ.

(वाचा : Career In Marchant Navy: दहावी पास उमेदवारही भारतीय नौदलामध्ये करिअर घडवू शकतात; असा करता येईल अर्ज)

पदांनुसार भरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : १६२ पदे

  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी: ८ पदे
  • रासायनिक अभियांत्रिकी: २५ पदे
  • स्थापत्य अभियांत्रिकी: ८ पदे
  • संगणक विज्ञान/अभियांत्रिकी: १५ पदे
  • इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी: ४० पदे
  • उपकरणे तंत्रज्ञान: ६ पदे
  • यांत्रिक अभियांत्रिकी: ५० पदे

अधिसूचना pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Talathi Bharti Exam 2023 Result: आता उत्सुकता तलाठी भरती परीक्षेच्या निकलाची; ‘या’ दिवशी पाहता येणार रिझल्ट)

वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता :

० या जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार राज्य मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळाकडून अभियांत्रिकी पदविका (Engineering Diploma) प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

० उमेदवारांनी ऑटोमोबाईल / केमिकल / सिव्हिल / कम्प्युटर / सायन्स / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंट / मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि इतरांसह संबंधित अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा (First Class Diploma Pass-out) असणे आवश्यक आहे.

० २०१९ पूर्वी डिप्लोमा केलेले किंवा सध्या डिप्लोमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. त्यामुळे, अशा उमेदवारांनी अर्ज करू नये.

निवड प्रक्रिया :

संबंधित पात्रता परीक्षेत मिळालेल्या कमाल गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
(अधिक माहितीसाठी, कृपया VSSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.)

VSSC भर्ती 2023 साठी अर्ज करण्यासाठी :

  • उमेदवारांना www.nats.education.gov.in किंवा www.sdcentre.org या वेबसाइटद्वारे शिक्षण मंत्रालयाच्या NATS पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
  • मुलाखतीदरम्यान नोंदणी क्रमांक आणि प्रिंटआउट सोबत घेऊन जाणे अनिवार्य असेल.
  • उमेदवारांना अधिसूचनेत नमूद केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत, अधिसूचनेत नमूद केलेल्या ठिकाणी भेट द्यावी लागेल.

(वाचा : Success Story IAS Kartik Jivani: आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तीनवेळा स्पर्धा परीक्षेला बसून तीनही वेळा यशस्वी झाला)

Source link

jobs for engineering diploma holderstechnical jobstechnician apprenticevikram sarabhai space center job openingsvikram sarabhai space center recruitmentVSSCvssc apprentice recruitment 2023vssc recruitmentvssc recruitment 2023vssc walk-in-interview
Comments (0)
Add Comment