Google Pixel 8 Pro नं बिनदिक्कत पास केली बेंड टेस्ट
गुगल पिक्सल ८ प्रो मध्ये ६.७ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो २००० निट्झच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. ह्या डिस्प्लेवर इतर फ्लॅगशिप अँड्रॉइड स्मार्टफोन प्रमाणे गोरिल्ला ग्लास विक्टस २ ची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे इतर डिवाइस प्रमाणे पिक्सलनं स्क्रॅच टेस्टमध्ये कामगिरी केली. तुम्ही पुढील व्हिडीओमध्ये पाहू शकता.
हे देखील वाचा: India vs Pakistan मॅचच्या निमीत्ताने Sansui ची मोठी घोषणा, भारत जिंकल्यास ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही मोफत
ह्या फोनमध्ये आयफोन १५ प्रो सीरिज प्रमाणे मजबूत टायटेनियम फ्रेम देण्यात आलेली नाही, ह्यात मेटल फ्रेम मिळते जी डिसेंट ड्युरेबिलिटी देते. जॅकच्या टेस्टमध्ये आयफोन १५ प्रो मॅक्सची बेंड टेस्ट करताना फोनवर दबाव टाकताच बॅक ग्लास फुटली. परंतु गुगल पिक्सल ८ प्रोमध्ये मात्र असं काहीही झालं नाही. फोन टेस्टमध्ये थोडा आवाज करत होता पण ह्या व्यतिरिक्त फोनल काही झालं नाही.
हे देखील वाचा: रेडमी-रियलमी टक्कर देईल का स्वस्त Samsung Galaxy A05s? १८ ऑक्टोबरला येतोय भारतात
जर तुम्ही पिक्सल ८ प्रो घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता डिवाइसच्या बिल्ड क्वॉलिटीची काळजी करण्याची गरज नाही. तसेच पिक्सल ६ आणि पिक्सल ७ प्रमाणाने ह्या नव्या सीरीजमध्ये कर्व्ह डिस्प्ले नाही. त्यामुळे हा फोन क्रॅक झाला नसावा. गुगल पिक्सल ८ ची किंमत भारतात ७५,९९९ रुपयांपासून सुरु होते तर पिक्सल ८ प्रोसाठी १०,०६९९९ रुपये मोजावे लागतील.