एनटीएने जाहीर केला जेईई मेन २०२४ परीक्षेचा अभ्यासक्रम; १३ भाषांमध्ये देता येणार परीक्षा

JEE Main 2024 Syllabus: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन २०२३ सत्र १ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. एनटीएने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जेईई परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

जेईई मेन २०२४ च्या अभ्यासक्रमाविषयी महितीसाठी येथे क्लिक करा

१३ भाषांमध्ये घेतली जाणार परीक्षा :

एनटीएच्या सूचनेनुसार, इंग्रजी, हिंदी आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या १३ भाषांमध्ये परीक्षा घेतली जाईल.

(वाचा : JEE Main 2024 Updates: ५ नोव्हेंबरपासून होणार जेईई परीक्षेची अर्ज नोंदणी प्रक्रिया? हे असेल संभाव्य वेळापत्रक)

उमेदवार JEE (मुख्य) – 2024 साठी दोन सत्रांमध्ये (सत्र १ आणि सत्र २) अर्ज करू शकतात आणि वेळापत्रकानुसार परीक्षा शुल्क भरू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर उमेदवारांना फक्त सत्र १ साठी अर्ज करायचा असेल तर त्यांना सध्याच्या अर्जादरम्यान सत्र १ साठी परीक्षा शुल्क भरावे लागेल. सत्र 2 (April 2024) साठी अर्जाची सूचना स्वतंत्रपणे जारी केली जाईल.

परीक्षा पद्धती :

जेईई मेन २०२४ साठी तीन पेपर असतील. B.Tech आणि BE साठी पेपर-१ असेल. तर पेपर-२ बी.आर्चसाठी असेल. तर, पेपर-३ बी.प्लॅनिंगसाठी असेल. सर्व पेपर्सची परीक्षा २ शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल. तर दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी ३ ते ६ या वेळेत पार पडेल.

JEE Main 2024 साठी अर्ज करण्यासाठी :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– आता यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
– फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
– Final Submit वर क्लिक करा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

Source link

jee main 2024jee main 2024 registrationjee main examजेईईजेईई परीक्षाजेईई मेन परीक्षा
Comments (0)
Add Comment