आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- भारत सरकारच्या समग्र शिक्षा अभियान योजने अंतर्गत उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात किमान ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
- यासोबतच, उमेदवाराला कामाचा अनुभवही आवश्यक आहे.
- याशिवाय, पोस्टनिहाय इष्ट पात्रता भिन्न आहेत.
- पीएच.डी., एमफिल किंवा संशोधन पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
वयोमर्यादा :
वेगवेगळ्या पदांसाठी लागू होणारी कमाल वय भिन्न आहे.
प्रधान मुख्य सल्लागार : ५५ वर्षे
मुख्य सल्लागार : ४५ वर्षे
वरिष्ठ सल्लागार : ४० वर्षे
सल्लागार: ३५ वर्षे
अर्ज शुल्काविषयी :
यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
मिळणार एवढा पगार :
वेगवेगळ्या पदांनुसार उमेदवारांना वेगवेगळे वेतन दिले जाईल.
प्रधान मुख्य सल्लागार – रु १ लाख ५० हजार ते रु. २ लाख रुपये प्रति महिना
मुख्य सल्लागार – रु १ लाख २० हजार ते १ लाख ५० हजार रुपये प्रति महिना
वरिष्ठ सल्लागार – रु १ लाख ते १ लाख २० हजार रुपये प्रति महिना
सल्लागार- रु ८० हजार ते १ लाख रुपये प्रति महिना
असा करा अर्ज :
- अधिकृत वेबसाइट edcilindia.co.in/TCareers वर जा.
- येथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा तपशील भरून नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडी आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करून उमेदवारांना त्यांचा अर्ज भरावा लागेल.
- यानंतर फॉर्म सबमिट करा. यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
महत्त्वाचे :
अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Cochin Shipyard Limited मध्ये भरती, BE – BTech उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपयांत मासिक वेतन)