भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये १८५ पदांवर भरती; असा करा अर्ज

AAI Apprentices Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण, AAI यांनी शिकाऊ (Apprentices) पदांसाठी अर्ज मागवण्यास सूरीवात केली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI च्या अधिकृत वेबसाइट aai.aero च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. याभरती मोहिमेद्वारे संस्थेतील १८५ पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर २०२३ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : १८५ जागा

सिव्हिल : ३२ जागा
इलेक्ट्रिकल : २५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स : २९ जागा
संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान : ७ जागा
एरोनॉटिकल : २ जागा
एरोनॉटिक्स : ४ जागा
आर्किटेक्चर : ३ जागा
मेकॅनिकल/ऑटोमोबाईल : ५ जागा
कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट : ७० जागा
गणित/सांख्यिकी : २ जागा
डेटा विश्लेषण : ३ जागा
स्टेनो (आयटीआय) : ३ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

AICTE, भारत सरकार द्वारे मान्यताप्राप्त संस्थांच्या कोणत्याही क्षेत्रातील पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा (नियमित) अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

वरील जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय १८ ते २६ वर्षे असावे.
३१ डिसेंबर २०२३ चा आधार घेऊन वयाची गणना केली जाईल.

निवड प्रक्रिया :

  • पात्रता परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या (%) आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखती/कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  • अंतिम निवड मुलाखत/प्रमाणपत्रांची पडताळणी आणि सामील होताना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्यावर आधारित असेल.

मिळणार एवढा पगार :

पदवीधर (पदवी) शिकाऊ उमेदवार : १५००० रुपये
तांत्रिक (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार : १२००० रुपये
ट्रेड अप्रेंटिस : ९०० हजार रुपये

(वाचा : Indian Air Force Jobs 2023: भारतीय वायुसेनेने ३२७ जागांवर भरती; २५० रुपये अर्ज शुल्क आणि १ लाख ७० हजारांहून अधिक पगार)

Source link

AAIaai apprentices 2023aai apprentices recruitment 2023AAI Recruitment 2023airport jobsAirports Authority of Indiaएयरपोर्ट जॉब्सभारतीय विमानतळ प्राधिकरण नोकरी
Comments (0)
Add Comment