इंडिया पोर्ट्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती; ५० वर्ष वयोमर्यादेच्या पदवीधरांना करता येणार अर्ज

IPGL Recruitment 2023 : इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) ने मॅनेजर (तांत्रिक) आणि डेप्युटी मॅनेजर (प्रशासन आणि एचआर) या पदांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आवश्यक अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ipgl.co.in या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता :
  • व्यवस्थापक पदासाठी, उमेदवाराने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी.
  • याशिवाय, व्यवस्थापकीय पदावर १७ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • तर, उपव्यवस्थापक पदासाठी एचआर स्ट्रीममधून पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय ५ वर्षांचा कामाचा अनुभव असणेही आवश्यक आहे.

वयोमर्यादा:
व्यवस्थापक पदासाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे.
तर, उपव्यवस्थापक पदासाठी ती ४० वर्षे आहे.

अर्ज शुल्काविषयी :

उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑफलाइन मोडमध्ये सबमिट करावा ज्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

(वाचा : Indian Air Force Jobs 2023: भारतीय वायुसेनेने ३२७ जागांवर भरती; २५० रुपये अर्ज शुल्क आणि १ लाख ७० हजारांहून अधिक पगार)

मिळणार एवढा पगार :

व्यवस्थापक पदासाठीच्या उमेदवारांना महिन्याला ३६, ६०० रुपये ते ६२ हजार २०० रुपये पगार मिळेल.
तर, उपव्यवस्थापक पदासाठी महिन्याला २४ हजार ९०० ते ५० हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत :

तुम्हाला दिलेल्या लिंकवर जाऊन नोटिफिकेशन ओपन करावे लागेल.
अधिसूचनेच्या शेवटी दिलेला अर्ज डाउनलोड करावा लागेल.
ते भरून पोस्टाद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागेल.

फॉर्म पाठवण्याचा पत्ता :

व्यवस्थापकीय संचालक, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, ४ था मजला, निर्माण भवन, मुजावर पाखडी रोड, माझगाव, मुंबई ४०००१०.

महत्त्वाचे : India Ports Global Limited (IPGL) भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी आणि या भरतीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : AAI Apprentices Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये १८५ पदांवर भरती; असा करा अर्ज)

Source link

india ports global limited bhartiindia ports global limited jobsipgl recruitment 2023jobs for graduatesmgr (tech)इंडिया पोर्ट्स लिमिटेड भरती
Comments (0)
Add Comment