एसबीआयच्या अधिसूचनेनुसार, सदर भरतीच्या माध्यमातून एकूण ५ हजार २८० पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांची निवड ३ टप्प्याच्या परीक्षेनंतर केली जाईल. जर उमेदवार पहिल्या टप्प्याच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला पुढील टप्प्याच्या परीक्षेसाठी बोलावले जाणार नाही.
SBI सर्कलनुसार पदभरतीचा तपशील :
अहमदाबाद : ४३०
अमरावती : ४००
बंगळुर : ३८०
भोपाळ : ४५०
भुवनेश्वर : २५०
चंदिगड : ३००
चेन्नई : १२५
ईशान्य भारत : २५०
हैदराबाद : ४२५
जयपूर : ५००
लखनऊ: ६००
महाराष्ट्र : ३००
मुंबई मेट्रो : ९०
नवी दिल्ली : ३००
तिरुवनंतपुरम : २५०
अधिसूचनेनुसार, निवडीसाठी उमेदवारांची परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये घेतली जाईल. परीक्षेबाबत अधिक माहिती अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल.
आवश्यक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी असलेले उमेदवार आ जागांसाठी अर्ज करू शकतात.
ज्या उमेदवारांकडे वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंटची पदवी आहे असे उमेदवारही या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास पात्रता ठरतील.
वयोमर्यादा :
- एसबीआयच्या भरतीमध्ये अर्ज करणार्या उमेदवारचे वय ३१ ऑक्टोबर रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त आणि २१ वर्षांपेक्षा कमी नसावे.
- उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०२२ नंतर आणि १ नोव्हेंबर १९९३ पूर्वी मोजले जाणार नाही.
- मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.
SBI CBO भरतीसाठी असा करा अर्ज :
– सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
– यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : SBI PO Prelims Result 2023 : एसबीआय पीओ प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर; मुखी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार)