तरुणांनो व्यक्त व्हा! ‘स्पीक फॉर इंडिया’ या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे सहावे पर्व लवकरच

Speak For India 2023: जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील तरुणांना देशाच्या विकासाबाबत परखड मते मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘स्पीक फॉर इंडिया’ या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे सहावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी यातून सर्वात मोठा वादविवाद मंच उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना या माध्यमातून भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळण्याबरोबरच विविध विषयांवरील परखड मतेही मांडता येणार आहेत. त्यासाठी नोंदणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

फेडरल बँक हॉर्मिस मेमोरिअल फाउंडेशतर्फे ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘टाइम्स ऑफ इंडिया’तर्फे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेत जिल्हा पातळीवरील स्पर्धांतून निवडलेल्या विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर स्पर्धा पार पडते. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची उपांत्य आणि अंतिम फेरी घेतली जाते. स्पर्धेतील विजेत्याला अडीच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेत्याला दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. यातील उपांत्य फेरीतील उर्वरित सहा स्पर्धकांना प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतून मत मांडता येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना www.speakforindia.in वर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करून या स्पर्धेत भाग घेता येईल.

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वगुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते. तरुणांना प्रभावित करणाऱ्या समाजातील विविध विषयांवर आवाज उठवण्यासाठी आणि त्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून कॉलेज विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिले जाते. या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रगतीशील कल्पनांचा मागोवा घेण्याची संधीही तरुणांना मिळते.

स्पीक फॉर इंडिया स्पर्धेमुळे मला स्पर्धा जिंकण्यापलीकडचा परिवर्तनीय असा प्रवास करता आला. त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. जगातील आणि प्रादेशिक पातळीवरील गंभीर सामाजिक विषयांचे विश्लेषण करण्याची क्षमता यातून मिळाली आहे. तसेच योग्य दृष्टिकोन मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मागील वर्षीचा विजेता पराग बदिर्के याने दिली.

मागील चार वर्षांच्या प्रवासात स्पीक फॉर इंडिया ही सर्वांत मोठी वादविवाद स्पर्धा होती. माझी मते मांडण्याची संधी मिळाल्याने क्षमतांचा विकास करता आला. हे शब्दांचे युद्ध आहे. त्यामुळे तुमची शस्त्रे धारदार करून या युद्धासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मागील वर्षीचा उपविजेता करण पारिक याने केले.

Source link

College studentscompetitiondebate skillsfederal bank hormis memorial foundationhone your debate skillsregister for speak for indiaspeak for indiaस्पीक फॉर इंडिया
Comments (0)
Add Comment