जेईई परीक्षेचे महितीपत्र प्रसिद्ध, या आहेत परीक्षेच्या अधिकृत तारखा, अर्ज शुल्क आणि निकलाची तारीख

JEE Advanced 2024 Information Brochure : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अ‍ॅडव्हान्स २०२४ चे माहिती पत्रक jeeadv.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. JEE Advanced 2024 बुलेटिन (माहिती पत्रक) मध्ये पात्रता निकष, नोंदणी शुल्क आणि परीक्षेचे इतर तपशील यांविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटीसह इतर नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी यंदा IIT मद्रास द्वारे JEE Advanced 2024 परीक्षा घेतली जात आहे.

२६ मे रोजी होणारी JEE Advanced 2024 परीक्षा आयोजित करण्यासाठी IIT मद्रासकडून सर्व तयारी केली जात आहे. माहितीनुसार, जेईई मेन २०२४ च्या टॉप २.५ लाख उमेदवारांना जेईई अ‍ॅडव्हान्स २०२४ परीक्षेसाठी बस्ता येईल. या परीक्षेसाठी उमेदवार jeeadv.ac.in वर नोंदणी करू शकतात.

(वाचा : JEE Advanced 2024 परीक्षा २६ मे या दिवशी; परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)

नोंदणी प्रक्रियेनंतर, JEE Advanced 2024 अर्जाची विंडो २१ एप्रिल रोजी उघडेल आणि ३० एप्रिल 2024 पर्यंत खुली राहील. त्यानंतर उमेदवार मर्यादित तपशीलांमध्ये बदल करू शकतील. यावेळी सर्व श्रेणींसाठी JEE Advanced 2024 अर्ज शुल्क वाढवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या २९०० रुपयांच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांकडून अर्जासाठी ३२०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

JEE Advanced 2024 तारखांनुसार, जेईई अ‍ॅडव्हान्स २०२४ परीक्षेचे प्रवेशपत्र १७ मे रोजी जारी केले जाईल. IIT मद्रास २ जून रोजी Answer Key जारी करेल तर, JEE Advanced चा निकाल ९ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल डाउनलोड करू शकतील.

जेईई मेन २०२४ ची परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एका सत्राची परीक्षा घेतली जाईल. तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. उमेदवारांना दोन्ही सत्रांमध्ये मिळालेल्या सर्वोत्तम गुणांचा विचार करता येईल. जेईई मेन आणि अ‍ॅडव्हान्स परीक्षा या देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. दरवर्षी १० लाखांहून अधिक उमेदवार जेईई मुख्य परीक्षेसाठी अर्ज करतात.

(वाचा : Board Exams Updates : दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा)

Source link

jee advanced 2023jee advanced 2024jee examsjee main 2024Joint Entrance Examinationजेईई परीक्षासंयुक्त प्रवेश परीक्षा
Comments (0)
Add Comment