साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारासाठी ‘देवबाभळी’ नाटकाची निवड

हायलाइट्स:

  • साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर
  • ‘देवबाभळी’ या नाटकाने मारली बाजी
  • प्राजक्त देशमुख यांचं लेखन आणि दिग्दर्शन

मुंबई : देशातील साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार (Sahitya Akademi Youth Award 2021) जाहीर झाला आहे. मराठी आणि बंगाली भाषेसाठी या पुरस्कारांची घोषणा झाली असून मराठीत ‘देवबाभळी’ या नाटकाने बाजी मारली आहे. या नाटकाच्या लेखनासाठी प्राजक्त देशमुख यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कारांच्या निवडीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारसीनंतर साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारासाठी ‘देवबाभळी’च्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नाशिकचे रंगकर्मी प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला रंगभूमीवरही चांगला प्रतिसाद मिळाला.

नेमकं कसं आहे देवबाभळी नाटकाचं कथानक?

संगीत देवबाभळी नाटकाच्या कथानकाचे सर्वत्रच कौतुक झाले. यात तुकोबांना शोधत त्यांची पत्नी आवली भटकत असते, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते. तेव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरतो अशी एक वदंता आहे. त्या काट्याच्याच नावाचे हे नाटक विठ्ठलाने आवलीच्या पायातला काटा काढल्यानंतर काय घडले असेल याचा वेध घेते.

विठ्ठल काटा काढून थांबत नाही. या जखमेचे निमित्त करून विठ्ठल रखमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवतो. दोन बायका एकत्र आल्या की गोंधळ उडतो; मात्र येथे या दोघी एकमेकींचा आणि पर्यायाने तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा, आस्तिक्याचा वेध घेतात. असे हे नाटक आहे.

Source link

marathi sahityasahitya academy awardनाटकसाहित्य अकादमीसाहित्य अकादमी युवा पुरस्कार
Comments (0)
Add Comment