राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबादमध्ये बारावी ते पदवीधरांसाठी विविध पदांवर भरती सुरु

NHM Osmanabad Recruitment 2023 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर पदभरती केली जाणार आहे. सदर संस्थेच्या वतीने भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या विहित तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.


पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदे : ५६ जागा

मेडिकल ऑफिसर आरबीएसके (पुरुष) : ३ जागा
मेडिकल ऑफिसर आरबीएसके (महिला) : १ जाग
मेडिकल ऑफिसर UG Unani (AYUSH) : १ जागा
मेडिकल ऑफिसर PG Unani (AYUSH) : १ जागा
डेन्टल सर्जन (डेंटिस्ट) : ६ जागा
सोशल वर्कर (एनएमएचपी) : १ जागा
स्टाफ नर्स (महिला) : ३६ जागा
फिसीओथेरपिस्ट : १ जागा
पॅरामेडिकल वर्कर (Leprosy) : १ जागा

तांत्रिक पदांच्या जागा :

सीटी स्कॅन टेक्निशियन (CT Scan Technician) : १ जागा
डेन्टल टेक्निशियन (Dental Technician) : २ जागा
डेन्टल हायजीनिस्ट (Dental Hygienist) : १ जागा
डेन्टल असिस्टंट (Dental Assistant) : १ जागा

मिळणार एवढा पगार :

या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा १५ हजार ८०० ते ३०,००० रुपयांपर्यंत पदानुसार पगार दिला जानर आहे देण्यात येणार आहे.
अधिक महितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

या पत्त्यावर पाठवा अर्ज :

उमेदवारांनी अर्ज “राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्रमांक २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.” या पत्त्यावर दिनांक ८ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत सादर करायचे आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबाद मधील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.
कमीत कमी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी पास असणे आवश्यक आहे, उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज शुल्काविषयी :

या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीयांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क तर इतर उमेदवारांसाठी १५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी ३८ वर्षे तर, जास्तीत जास्त ४३ वर्षापर्यंत असावे.
(उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचा)

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून दिलेल्या पत्त्यावर पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • अर्धवट भरलेले तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

महत्त्वाच्या लिंक्स :

पदभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पदभरतीसाठी अर्जाचा मूळ नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

NHM Osmanabad च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

dharashiv newsNational Health Missionnhm dharashiv (osmanabad) recruitmentnhm dharashiv osmanabad) recruitmennhm osmanabad recruitmentosmanabadosmanabadt jobsrashtriya arogya abhiyanराष्ट्रीय आरोग्य अभियान २०२३
Comments (0)
Add Comment