एअर इंडिया हवाई सेवेमध्ये विविध पदांसाठी भरती; तब्बल ८२८ जागांसाठी महाभरती प्रक्रिया

AIASL Recruitment 2023 : एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AI Airport Services Limited (AIASL) ने विविध बारा पदांच्या तब्बल ८२८ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एआयएएसएल मधील या पदांची भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार आहे.

एअर इंडिया हवाई सेवेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणार्‍या इच्छुक उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AI Airport Services Limited (AIASL) म्हणजेच Air India Transport Services Limited

AITSL Recruitment 2023 : एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये भरती; बारावी पास ते पडवीधरांसाठी सुवर्णसंधी
भरले जाणारे पद :

एकूण रिक्त पदसंख्या : ८२८ जागा

  • डेप्युटी व्यवस्थापक रॅम्प / मेंटेनेंस : ०७ जागा
  • ड्युटी मॅनेजर – रॅम्प : २८ जागा
  • कनिष्ठ अधिकारी तांत्रिक : २४ जागा
  • रॅम्प सेवा एक्झिक्युटिव : १३८ जागा
  • यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : १६७ जागा
  • ड्युटी मॅनेजर पॅसेंजर : १९ जागा
  • ड्युटी अधिकारी पॅसेंजर : ३० जागा
  • ड्युटी मॅनेजर कार्गो : ०३ जागा
  • ड्युटी अधिकारी कार्गो : ०८ जागा
  • कनिष्ठ अधिकारी कार्गो : ०९ जागा
  • सिनियर कस्टमर सेवा एक्झिक्युटिव : १७८ जागा
  • कस्टमर सेवा एक्झिक्युटिव : २१७ जागा

शैक्षणिक पात्रता:
पदवीधर / इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी / आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.

महत्त्वाचे :

एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या भरतीची विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता, मिळणारा पगार आणि इतर तपशील मूळ जाहिरातीमध्ये वाचा.

अर्ज प्रक्रिया आणि अर्ज शुल्का विषयी :

जाहिरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी पदांनुसार दिनांक १८ ते २३ डिसेंबर २०२३ पर्यंत GSD Complex Near Sahar Police Station CSMI Airport Terminal – 2 Gate No.05 Sahar Andheri – East Mumbai – 400099 या पत्यावर हजर रहायचे आहेत .

सदर पदभरतीसाठी उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. “AI AIRPORT SERVICES LIMITED” या नावाने डिमांड ड्राफ्ट अर्जसोबत सादर करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या लिंक्स :

एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

AAICLAS मध्ये सिक्युरिटी स्क्रीनरच्या ९०६ पदासाठी भरती, फ्रेशर्सही करू शकणार अर्ज; महिलांना फीमध्ये सूट

Source link

ai airport services limitedaiaslairport jobsaitsl recruitment 2023jobs at air indiajobs for customer service executivepan india jobsएअरपोर्ट जॉब्सएआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड
Comments (0)
Add Comment