“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे आंतरराष्ट्रीयीकरण” या पहिल्या सादरीकरणात भारताच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानांकनाचे एकत्रीकरण यावर प्रकाश टाकण्यात आला. भारतीय शिक्षणाची जागतिक स्थिती उंचावण्याच्या उद्देशाने स्थानिक शैक्षणिक परंपरांसह जागतिक सर्वोत्तम पद्धतींच्या सुसंवादी मिश्रणाच्या गरजेवर या सत्रात भर देण्यात आला.
“बहुविद्याशाखीय शैक्षणिक कार्यक्रम आणि कौशल्य विकास एम्बेडेड इंटर्नशिप,” या सदराखाली कौशल्य विकासाला सैद्धांतिक ज्ञानाशी जोडण्यासाठी आंतरविद्याशाखीय शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ज्ञान व प्रात्यक्षिक अनुभव कसे मिळावता येईल यावर या सत्रात मार्गदर्शन करण्यात आले.
“मूल्यांकन सुधारणा आणि मूल्यमापन,” या सत्रात, शिक्षणातील मूल्यांकन पद्धतींचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. या सत्रातील सादरीकरणामध्ये पारंपारिक रॉट मेमोरिझेशनपेक्षा व्यावहारिक कौशल्यांना प्राधान्य देण्यासाठी नवीन मूल्यमापन तंत्रे प्रस्तावित केली गेली.
कार्यशाळेतील प्रश्नोत्तराच्या समारोपीय सत्रात विविध विभागातील विभागप्रमुख, संचालक आणि शिक्षक यांच्यासोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक नवकल्पना, आव्हाने आणि संधी यावर विविधांगी चर्चा करण्यात आली. उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने पाऊल टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रतिष्ठित सेंट लुईस विद्यापीठाबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या दोन्ही उभयतांमधील शैक्षणिक सामंजस्यातील सहयोगी प्रयत्नातून या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.