इस्रोमध्ये १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, ६५ हजारांहून अधिक पगार; आजच करा अर्ज

ISRO Recruitment 2023 : तुम्हाला ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सामील व्हायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ISRO ने तंत्रज्ञ बी (Technician B) पदांसाठी भरती जाहीर केली आहे असून, या जागांसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ज्या तरुणांना या रिक्त पदाचा भाग व्हायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज सबमिट करावा. या लेखात रिक्त पदांबद्दल महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आल आहे.

पदभरतीचा तपशील :

तंत्रज्ञ बी (Technician B) पद

महत्त्वाच्या तारखा :

अर्जाची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली असून, उमेदवार ३१ डिसेंबरपर्यंत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करू शकतात.
शेवटच्या तारखेनंतर येणार्‍या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे.
(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)शैक्षणिक पात्रता :

तंत्रज्ञ बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचे दहावी उत्तीर्ण आणि ITI पास प्रमाणपत्र असावे. पात्रता तपशील तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

वयोमर्यादा :

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असल्याची खात्री करावी.
तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्काविषयी :

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना अर्जाचे शुल्कही भरावे लागेल.
शुल्काची माहिती अधिसूचनेत दिली आहे.

अशी असणार निवड प्रक्रिया :

तंत्रज्ञ बी पदांसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्यावी लागेल.

मिळणार एवढा पगार :

ISRO च्या या भरतीच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर उमेदवारांना वेतन स्तर 3 (Scale 3) नुसार वेतन मिळेल. म्हणजेच, उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

Source link

isroisro recruitmentisro recruitment 2023isro recruitment 2023 applicationisro recruitment 2023 apply onlineisro technician b recruitment 2023isro technician b vacancy 2023isro technician recruitmentisro vacancy 2023इस्रो भरती
Comments (0)
Add Comment