ठाणे महानगरपालिकेअंतर्गत भरती; या रुग्णालयातील जागांसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार निवड प्रक्रिया

Thane Mahanagarpalika Recruitment : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ‘अधिव्याख्याता (Lecturer)’ आणि ‘वैद्यकीय अधिकारी’ या पदाकरीता कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे/प्रमाणपत्रे दोन प्रति मध्ये स्वयंसाक्षांकित (Self Attested) करून मुलाखतीच्या वेळी दिलेल्या तारखेस उपस्थित रहायचे आहे.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदे : २५ जागा

अधिव्याख्याता पदाच्या एकूण १५ जागा

मेडिसीन : ३ जागा
टीबी चेस्ट : १ जागा
पिडीयाट्रिक : १ जागा
अ‍ॅनेस्थेशीय : ४ जागा
फार्मकॉलॉजी : १ जागा
बायोकेमिस्ट्री : १ जागा
ओ.बी.जी.वाय : २ जागा
सर्जरी : १ जागा
ऑथोपेडीक : १ जागा

वैद्यकीय अधिकारी एकूण १० जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

अधिव्याख्याता पदासाठी :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एमबीबीएस)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबंधित विषयातील पदवी (एमडी / एमएस / डीएनबी)
  • राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संध्या / खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्स अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव
  • राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वैद्यकीय अधिकारी पदासाठी :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एमबीबीएस)
  • राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन असणे आवशयक
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

मिळणार एवढा पगार :
वरील पदांकरिता उमेदवाराला दरमहा वैद्यकीय अधिकारी पदासाठी ७५,००० रुपये तर अधिव्याख्याता पदासाठी १,५०,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

मुलाखतीविषयी :

ठाणे महानगर पालिकेच्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता खलील पत्त्यावर होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता :

कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • अर्धवट तसेच अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज नाकारण्यात येतील, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या लिंक्स :

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

recruitmentThanethane jobs 2023Thane Mahanagarpalika Recruitment 2023Thane Municipal Corporation Recruitment 2023ठाणे महानगरपालिका भरती २०२३ठाणे महापालिका भरती २०२३ठाणे सरकारी हॉस्पिटल
Comments (0)
Add Comment