यूको बँकेमध्ये भरतीसाठी देशभरातील उमेदवार करू शकणार अर्ज; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

UCO Bank Recruitment 2023 : युनायटेड कमर्शियल बँकेमध्ये एकूण १४२ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी यूको बँकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचून, खालील पत्त्यावर २७ डिसेंबर २०२३ पर्यंत सादर करायचे आहेत.

पदभरतीचा तपशील :
  • मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट (Manager-Risk Management in MMGS-II) : १५ जागा
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager) : १ जागा
  • चीफ मॅनेजर (Chief Manager) – Fintech Management : १ जागा
  • चीफ मॅनेजर (Chief Manager) – Digital Marketing : १ जागा
  • सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Network Administration : २ जागा
  • मॅनेजर (Manager) – Network Administration : ८ जागा
  • सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Database Administration : २ जागा
  • मॅनेजर (Manager) – Database Administration : ३ जागा
  • सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Merchant Onboarding : १ जागा
  • मॅनेजर (Manager) – Merchant Onboarding : ३ जागा
  • असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) – Merchant Onboarding : २ जागा
  • मॅनेजर (Manager) – Merchant Onboarding : ३ जागा
  • सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Innovation an Emerging Technology : १ जागा
  • मॅनेजर (Manager) – Innovation an Emerging Technology : ३ जागा
  • सिनिअर मॅनेजर (Sr. Manager) – Software Developer : २ जागा
  • मॅनेजर (Manager) – Software Developer : १३ जागा
  • मॅनेजर (Manager) – MIS and Report : ६ जागा
  • मॅनेजर (Manager) – Data Analyst : ४ जागा
  • मॅनेजर (Manager) – Data Scientist : ४ जागा
  • फायर ऑफिसर (Fire Officer) : १ जागा
  • मॅनेजर ईकोनोमिस्ट (Manager Economist) : ४ जागा
  • मॅनेजर लॉ (Manager Law) : १३ जागा
  • मॅनेजर क्रेडिट (Manager Credit) : ५० जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

ही भरती प्रक्रिया स्पेशलिस्ट ऑफिसर, मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II इत्यादी पदांवर होणार असून या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असणार आहे यामध्ये किमान CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM, B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/ पदव्युत्तर पदवी,पर्यंत आवश्यक आहे.यासाठी उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

(UCO Bank मधील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असून, अधिक महितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.)

वयोमर्यादा :

सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०२३ रोजी कमीत कमी २१ वर्षे व जास्तीत जास्त ३५ वर्षापर्यंत असावे.
यामध्ये एससी / एसटी उमेदवारांना ५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज :

यूको बँकेतील ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून, उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचे आहेत.

पत्ता :
महाव्यवस्थापक, यूको बँक, मुख्य कार्यालय, ४था मजला, एच.आर.एम विभाग, १०, बीटीएम सरानी, कलकत्ता, पश्चिम बंगाल : ७०० ००१ या पत्त्यावर २७ डिसेंबर २०२३ पूर्वी सादर करायचे आहेत.

अर्ज शुल्काविषयी :

या भरतीसाठी अर्ज शुल्क जनरल / ईडब्ल्यूएस /ओबीसी उमेदवारांसाठी ८०० रुपये तर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स :

UCO Bank Bharti 2023 च्या भरतीची जाहिरात १ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

UCO Bank Bharti 2023 च्या भरतीची जाहिरात २ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

UCO Bank Bharti 2023 साठी यूको बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Source link

Banking Jobsjobs in bankpan india jobssarkari naukariuco bank bharti 2023uco bank recruitment 2023युनायटेड कमर्शियल बँक
Comments (0)
Add Comment