दिवाळीत शिर्डी मतदार संघात साखर वाटप केल्यानंतर विखे पाटील यांच्यावतीने आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात साखर वाटप सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात रेशनकार्ड धारकांना साखर आणि चना दाळ वाटप करण्यात येत आहे. ही सरकारी योजना नव्हे तर विखे पाटील स्वखर्चाने हे वाटप करीत असल्याचे सांगण्यात आले. अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मतदारसंघात दुसरी दिवाळी साजरी करण्याचा विखे पाटील यांचा मानस असून त्यानिमित्त साखर वाटप सुरू आहे.
अखेर विखे पाटलांकडून देण्यात आलेली साखर मिळाली,आजीबाईंनी म्हणाल्या…#Ahmednagar #Sugardistribution pic.twitter.com/fjZV1GnBZQ
— Maharashtra Times (@mataonline) December 20, 2023
मात्र, या उपक्रमात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गोंधळ झाल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यात संताप व्यक्त करणाऱ्या महिलेने आपल्याला १९ तारखेला साखर मिळाल्याचे म्हटले आहे. जुन्या व्हिडिओबद्दल खुलासा करताना त्यांनी म्हटले आहे की, त्यावेळीच येथे साखर वाटप करण्यात आली होती. परंतु काही विरोधी कार्यकर्त्यांनी मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार घडला. आम्ही आजही विखे पाटील परिवाराच्या सोबत आहोत. यापुढेही राहू. आम्हाला साखर मिळाली आहे.
रेशन कार्ड धारक कुटुंबीयांना साखर व दाळ वाटप करण्यात येत आहे. खासदार विखे पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरवात झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम होत आहे. बोधेगावच्या घटनेनंतर असा गोंधळ उडणार नाही, चुकीची माहिती दिली जाणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचे विखे पाटील यांच्या यंत्रणेकडून सांगण्यात आले. विखे पाटील यांनी पूर्वीच आपली साखर काही विरोधकांना कडू लागत असल्याचे म्हटले होते, त्यानुसार यासंबंधी गोंधळाची चुकीची माहिती मुद्दाम प्रसारित केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.