OnePlus Ace 3 चा डिस्प्ले
टिपस्टरनुसार, OnePlus Ace 3 मध्ये १.५के रिजॉल्यूशन आणि कर्व्ह एजसह ६.७८-इंचाचा BOE X1 डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. लीकनुसार, फोनमध्ये वनप्लस १२ सारखीच पीक ब्राइटनेस आणि पीडब्लूएम डिमिंग असेल. विशेष म्हणजे वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंचाचा क्वॉड-एचडी+ एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिजॉल्यूशन १,४४० x ३,१६८ पिक्सल, ४,५०० निट्स ब्राइटनेस आणि २१६०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग रेट आहे.
डिजटल चॅट स्टेशननुसार, OnePlus Ace 3 स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट, १०० वॉट फास्ट चार्जिंग, ५५००mAh बॅटरी आणि फुल-मेटल फ्रेम सह येऊ शकतो, जे वनप्लस १२ मध्ये देखील आहेत. एक्स वर आलेल्या एका एक चीनी रिटेलर वेबसाइटच्या स्क्रीनशॉटनुसार, वनप्लस एस ३ चीनमध्ये १७ डिसेंबर, २०२३ ला लाँच केला जाईल.
OnePlus Ace 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन
वनप्लस एस ३ मध्ये ६.७४-इंच १.५के ओएलईडी डिस्प्ले, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि पीडब्लूएम डिमिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी पंच-होल कटआउट असू शकतो. फोनमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,५०० एमएएचची बॅटरी असण्याची शक्यता आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर,आयपी६८ रेटिंग आणि डॉल्बी अॅटमॉस.
स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८९० सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड ओमनीव्हिजन ओव्ही८डी१० सेन्सर आणि ३२ मेगापिक्सलची सोनी आयएमएक्स७०९ टेलीफोटो लेन्स असण्याची शक्यता आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.
OnePlus Ace 3 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट असण्याची शक्यता आहे. सोबत २४जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १टीबी यूएफएस ४.० स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोन अँड्रॉइड १४ आधारित कलरओएस १४ कस्टम स्किनवर चालू शकतो.