मध्येच करोना आला, अन्यथा…; महसूलमंत्र्यांनी सांगितली सरकारची अडचण

अहमदनगरः ‘राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने (maha vikas aghadi) शेतकऱ्यांसाठी सहज व सोप्या पद्धतीने दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. यातून जिल्हा बँकेला चौदाशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली. मध्येच करोनाचे संकट आले, अन्यथा दोन लाखांच्या पुढचीही माफी देता आली असती. परंतु आगामी काळात तीही नक्की दिली जाईल,’ अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली.

संगमनेरमध्ये शंभर टक्के कर्ज वसुलीचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांचा थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कर्जमाफीमध्ये करोनाचा अडथळा ठरल्याचे सांगताना त्यांनी करोनासंबंधी दक्षता घेण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, ‘सध्या करोनाचा काळ आहे. आगामी दोन महिने अत्यंत काळजीचे आहेत. करोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. नियम शिथील झाल्याने आता आपल्याला करोना होणार नाही, अशा भ्रमात कोणी राहू नये. तो कोणालाही होऊ शकतो.’

‘यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी गेली’; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

सहकार क्षेत्राबद्दल बोलताना थोरात म्हणाले, ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. ती टिकवली पाहिजे आणि निकोप पद्धतीने जपली पाहिजे. अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे. म्हणूनच बँकेची यावेळची निवडणूक पक्ष विरहित व सर्वांना बरोबर घेत बिनविरोध केली,’ असेही थोरात म्हणाले.

‘नारायण राणेंच्या कारकीर्दीचे सर्वाधिक नुकसान त्यांच्या मुलांनी केले’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, माजी उपाध्यक्ष रामदास वाघ, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, लक्ष्मणराव कुटे, अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, भारत शेठ मुंगसे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यावेळी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यात यावर्षी ९९.५५ टक्के कर्जवसुली झाली आहे. ३८ शाखांपैकी ३५ शाखांची शंभर टक्के वसुली झाली आहे. याबद्दल पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाताय?; ‘हे’ नियम बंधनकारक

Source link

Balasaheb Thoratbalasaheb thorat latest newsbalasaheb thorat news updateकर्ज वसुलीबाळासाहेब थोरातबाळासाहेब थोरात न्यूज
Comments (0)
Add Comment