धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारून केला आयुष्याचा शेवट

लातूर: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. सरकारकडून आश्वासन मिळूनही एसटी आरक्षण दिले जात नसल्याने आलेल्या नैराश्यातून लातूर जिल्ह्यातील आष्टी या गावच्या रमेश चंद्रकांत फुले (वय ३६)या तरुनाने रेल्वेखाली उडीमारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. आंदोलने करूनही आरक्षण मिळत नसल्याने आपण नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले आहे.

मयत रमेश फुले यांचे १२पर्यंत शिक्षण झाले असून त्यांच्या पश्चाताप दोन मुली, एक मुलगा पत्नी, आई – वडील, भाऊ- भावजय, पुतणे असा परिवार आहे. गुंठाभर ही शेती नाही अन शिकून नोकरीही नाही त्यामुळे घरप्रपंच भागविण्यासाठी तो शेत मजुरी करायचा. सत्तेवर आल्यावर पहिल्याच मंत्री मंडळात धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते, त्यानंतर ते सत्तेवर आले दरम्यान सरकार कोसळले ते पुन्हा एकदा सत्तेवर आले, पण धनगरांच्या तोंडाला पानेच पुसली गेली, मराठा आरक्षणाकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे. मात्र धनगर आरक्षणाकडे साथ दुर्लक्ष केले जात आहे, अशी भावना तो नेहमीच व्यक्त करायचा.

धनगरांना एसटी आरक्षण मिळाले तर तरुणांना नोकरीच्या संधी अधिक मिळतील असे रमेश फुले यांना वाटायचे. पण एसटी आरक्षणासाठी धनगर आणि अनेक आंदोलने करूनही अद्याप आरक्षण मिळालं नाही त्यामुळे ते सतत नैराश्यात असायचे. रात्री ते कामानिमित्त बाहेर पडले अन घरी आलेच नाहीत. वडील जेवायचे थांबले होते. पण मुलगा घरी आला नाही सकाळी त्याने आत्महत्या केल्याचा निरोपच आला अन वर्धाक्याने खांगलेल्या बापाचा काळजाचा ठोका चुकला. आरक्षण काय असत नेमक कळत नाही पण आपला पोरगा नेहमी म्हणायचा नोकरी मिळते. आता काय करू मी मला फक्त माझा पोरगा आणून दया हो म्हणून त्याने टाहो फोडला. रमेशच्या आईची अन पत्नीची अवस्था याहून वेगळी नाही. पदरात असणाऱ्या लेकराचं कस करू. मी आता कस जगू असा सवाल रमेशची पत्नी करत आहे. या आक्रोशने आष्टा गाव हळहळले आहे.

रमेश फुले यांचा मृतदेह नाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. जोपर्यंत नोकरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत रमेश फुले यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. चाकूर तहसील समोर नातेवाईकांनी ठिय्या मांडला आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Source link

dhangar reservationyouth commits suicideyouthsuicide for dhangar reservationतरुणाची आत्महत्याधनगर आरक्षणलातूर
Comments (0)
Add Comment