जळगाव: राज्यात शीतलहर पसरली असून, अनेक जिल्ह्यांचा पारा कमालीचा घसरला आहे. राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान सोमवारी जळगावमध्ये नोंदवले गेले असून, पारा ९.६ अंशांपर्यंत घसरले होते. त्या खालोखाल गोंदिया (१०.५), चंद्रपूरच्या (११.४) तापमानात घट नोंदवली गेली. उत्तरेकडून सक्रिय शीतलहरींमुळे थंडी वाढली असून, सकाळी धुकेही दाटून येत आहे.
जळगावकरांना भरले हिव
जळगावकरांना भरले हिव
जिल्ह्यात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत असून, राज्यात जळगावात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. सोमवारी जळगावचा पारा ९.६ अंशावर गेला होता. एकीकडे रात्रीच्या तापमानात घट होत असली तरी दिवसाच्या तापमानात मात्र तीन अंशांची वाढ होऊन पारा ३१ अंशांवर गेला आहे.
थंडीचा रब्बीला फायदा
गेल्या दोन आठवड्यांपासून थंडीची लाट पसरल्याने रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांना चांगलाच फायदा होत आहे. कोरडवाहू ज्वारी, मका या पिकांनादेखील फायदा होत आहे.
राज्यातील थंड जिल्हे (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव : ९.६
गोंदिया : १०.५
चंद्रपूर : ११.४
वाशिम : ११.४
पुणे : ११.७
Read Latest Maharashtra News And Marathi News