महत्वाची बातमी! मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताय? वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा ‘हा’ निर्णय वाचाच

पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटक लोणावळा या ठिकाणी दाखल होत असतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. कारण नुकताच नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या आल्याने पुन्हा एकदा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावेळी देखील अवजड वाहनांना दुपारी १२ नंतर वाहने मार्गस्थ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी बबनराव तायवाडेंचा मनोज जरांगेंवर घणाघात, म्हणाले- राज्यात मराठ्यांची संख्या ३ कोटी आहे का?
याबाबत महामार्ग पोलिसांनी मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले तेव्हा मागील शनिवारी २४ तासांमध्ये ५५,६८६ वाहने द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनी वरून गेली. तसेच मुंबई पुणे जुना महामार्ग NH48 या वरून २१,१३५ वाहने गेली. या वाहनांना घाटामधील संयुक्तिक मार्गाचा सुद्धा वापर करावा लागतो. इतक्या प्रचंड प्रमाणात वाहने आल्यानंतर घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.

दिवसाला ७० हजार तर महिन्याला २१ लाखांचा तोटा, छ. संभाजीनगरातील जवळपास ८० टक्के गाव संकटात

तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी १२ नंतर सुरू केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन आणि वेळची बचत होईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र मागच्या आठवड्यात अनेक वाहने रस्त्यावर बंद पडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसानही झाले होते. त्यामुळे आता प्रवाशी नागरिकांनी देखील वाहने आणाताना सुरक्षितरित्या ती वाहने चालवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

Source link

Mumbai Pune Expressway Newsmumbai-pune expressway traffic newsPune newstraffic newsपुणे बातमीमुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीवाहतूक कोंडी बातमी
Comments (0)
Add Comment