राज्यात नवे ७५ नाट्यगृह सोलरवर उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा

सांगली : राज्यात महासांस्कृतिक वारसा चालविला जातो. मात्र नाट्यगृहाची अवस्था समाधारकारक नाही. २१व्या शतकाला सामोरे जात असताना नाट्य कला क्षेत्रात आव्हाने आहेत. त्याचा विचार करावा लागत आहे. नाट्य क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्यात नव्याने ७५ नाट्यगृह सोलर यंत्रणेवर उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगलीत केली. शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्य क्षेत्र जनतेच्या सिंहासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पूर्ण शक्तीने उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १००वे मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते ९९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाले.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, नाट्य क्षेत्रातील दिशा सकारात्मक हवी, यासाठी १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने चिंतन आणि चर्चा व्हायला पाहिजे. प्रशांत दामले यांचे एकसारखे १२ हजार प्रयोग झाले, परंतु नाट्य पहायला येणार्‍यांची संख्या कमी होत आहे. परंतु जोपर्यंत दर्दी लोक आहेत, तोपर्यंत नाटकावर वाईट दिवस कधीच येवू शकत नाहीत. नाट्य या सर्वोत्कृष्ट कलेपुढे आव्हाने असून त्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली. नाट्य कला जनतेच्या सिंहासनापर्यंत कायम चिकटवण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग पूर्ण ताकदीने उभा राहिल.

राज्यात नव्याने ७५ नाट्यगृह उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे, परंतु नाट्यगृहाचे भाडे परवडत असल्याच्या तक्रारी आहेत. नवी नाट्यगृहे सोलर यंत्रणेवर चालवून अल्प दरात उपलब्ध करुन दिली जातील. राज्यात ८६ नाट्यगृह आहेत. त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थाकडे आहेत. या परिस्थितीत अवघी १२ नाट्यगृह सुसज्य आहेत. नाट्यगृहाची दयनिय अवस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभागही सरसावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त राज्यातील ३६ जिल्ह्यात जानता राजा हे नाटक दाखविण्याचे नियोजन केले असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Source link

cultural affairs minister sudhir mungantiwarnew 75 theaters in maharashtranew 75 theaters will be built in the stateराज्यात नवे नाट्यगृहसुधीर मुनगंटीवार
Comments (0)
Add Comment