प्रकाश आंबेडकरांचं मविआतील तिन्ही पक्षांना पत्र, लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युलाच सुचवला

मुंबई : ‘भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी राज्यातील ४८ लोकसभा जागांचे समान वाटप करून जागावाटपातील संघर्ष संपवावा,’ असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्र लिहून सुचविले. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांना पाठविलेल्या या पत्रात राज्यातील जागावाटपाबाबत काहीही निर्णय होत नसून, सहभागी चारही पक्षांना समान १२ लोकसभा जागा मिळाल्या तर ते व्यवहार्य आणि संघर्षमुक्त राहील, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

पवारांचे कौतुक, ‘इंडिया’ आघाडीत सहभागासाठी काँग्रेसच्या उत्तराची प्रतीक्षा, वंचितचं पत्र
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार, की नाही याविषयी अजूनही स्पष्टता नाही. उद्धव ठाकरे यांनी ‘वंचित’ला सोबत घेण्याचा मानस व्यक्त केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नुकतेच ‘वंचित’ला या आघाडीत समाविष्ट करण्यासाठी खर्गे यांना सुचविल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली.

आधी पार्थ पवारांना निवडून आणा, मग बाकी गप्पा; शरद पवार गटाच्या नेत्याचं अजितदादांना चॅलेंज
या बैठकीत राज्यातील लोकसभा जागांचे चार पक्षांत समान वाटप करून प्रत्येकाने १२ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. गुरुवारी आंबेडकर यांनी तिन्ही पक्षप्रमुखांना पत्र लिहून या जागावाटपाच्या सूत्रावर लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. या पत्रात आंबेडकर यांनी लिहिले की, महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांमधील जागावाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींची कितीही चर्चा सुरू असली, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही.

बाबासाहेबांचा पक्ष मी आणि प्रकाश आंबेडकर दोघांनी मिळून चालवला तर त्याला यश येईल | रामदास आठवले

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

prakash ambedkar letterSharad PawarUddhav Thackerayउद्धव ठाकरेनाना पटोलेप्रकाश आंबेडकर पत्रमहाविकास आघाडी जागावाटप फॉर्म्युलालोकसभा निवडणूक २०२४शरद पवार
Comments (0)
Add Comment