शेतातून घरी जाताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, ग्राम पंचायत सदस्यासह दोघांचा मृत्यू, गावात हळहळ

नांदेड: शेतातील कामे आटोपून ट्रॅक्टरने घराकडे जात असलेल्या ग्राम पंचायत सदस्यासह दोघावर वाटेतच काळाने घाला घातला. ट्रॅक्टर कालव्यात उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं. अर्धापूर तालुक्यातील चाभरा तांडा शिवारात ही दुर्देवी घटना घडली. अजय अनिल राठोड (वय २८) आणि लखन प्रकाश राठोड (वय २८) असं मृतकाच नाव आहे. या घटनेत अन्य एक जण बचावल्याची माहिती आहे. या घटनेने गावात एकच शोककळा पसरली आहे.

मयत अजय राठोड आणि लखन राठोड हे चाभरा गावातील रहिवासी आहेत. तिघेजण ट्रॅक्टर घेऊन शेतात नांगरटी करण्यासाठी गेले होते. नांगरटीचे काम आटोपून परत ट्रॅक्टरने घराकडे जात होते. गावाजवळ असलेल्या कालव्याच्या मार्गाने जात असताना चालकाचा ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर उलटून कालव्यामध्ये कोसळला.

कालव्याला पाणी सुटल्याने कालवा पूर्ण पणे भरून वाहत होता. त्यामुळे घटनेनंतर दोघे जण ट्रॅक्टरखाली अडकून होते. बाहेर येता न आल्यामुळे अजय आणि लखन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर एक जण या अपघातात बालबाल बचावला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. मृतक अजय राठोड आणि लखन राठोड यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता.

मयत लखन राठोड हा ग्राम पंचायत सदस्य होता. काही महिन्यानंतर तो उपसरपंच देखील होणार होता. मात्र नियतीने घात केला. दरम्यान, या घटनेने चाभरा तांडा गावात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविच्छेदनानंतर दोघांवर एकाच वेळी अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भरधाव कार ७०-८० फूट खोल दरीत कोसळली, रात्रभर तशीच पडून; दोन जिवलग मित्रांचा एकत्र मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

accident newsmarathi news todaynanded accident newsnanded newstractor collapsed in canal
Comments (0)
Add Comment