याविषयी सविस्तर माहिती अशी की, अजय शहाणे याला प्रचंड दारूचे व्यसन असून तो दररोज आपल्या वडिलांना दारूसाठी पैसे मागत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय शहाणे हा दारू पिऊन धिंगाणा घालत असे, भांडणे करत असे, त्यामुळे घरातील सर्वजण वैतागले होते.
अशातच मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अजयने आपल्या वडिलांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण घरची आर्थिक परिस्थिती एकदम जोखमीची असल्याने त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे वडील बजरंग शहाणे यांनी पैसे नसल्याचे मुलाला सांगितले. मग त्याने मला दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही म्हणत वडिलांच्या अंगावर चक्क पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले.
आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी बजरंग शहाणे यांना लागलेल्या आगीतून वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना लागलेली आग विझवली आणि सेलू येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. बजरंग शहाणे हे गंभीरित्या भाजलेले असल्याने त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयातील जळीत विभागात रात्री उशिरा ऍडमिट करण्यात आले आहे.
बजरंग शहाणे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, रात्री उशिरा सेलू पोलिसांनी बजरंग शहाणे यांनी दिलेल्या जबाबानुसार मुलगा अजय शहाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News