-आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मतदारनोंदणी कार्यक्रमाची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता ५ जानेवारीपर्यंत मतदारांना आपली नावे नोंदविता येतील.
-जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ५ जानेवारी रोजी येणारी अंतिम मतदारयादी आता २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
-नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे १२ मतदारसंघ असून ही मतदारसंघनिहाय मतदारयादी अद्ययावत केली जात आहे. ती अद्ययावत करत असताना यादीतील मृत व्यक्तींची नावे गाळण्यात येत आहे.
-मतदारयादी अचूक करण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेरचा वापर करण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरने सारखी दाढी, टोपी यासह चेहऱ्यांवरील इतर खुणांची ओळख पटवून सारख्या चेहऱ्यांचे मतदार शोधून काढले.
शहरातील ‘सेम टू सेम’
पूर्व : ४,२४४
मध्य : १,९००
पश्चिम : १,३१८
उत्तर : ३,२०५
दक्षिण-पश्चिम : १,७९७
दक्षिण : २,७७२
नावांत, पत्त्यांमध्येही गोंधळ
पूर्व : १,०४०
मध्य : ५१९
पश्चिम : ४५३
उत्तर : १,६८५
दक्षिण पश्चिम : १,१२७
दक्षिण : १,३२५
प्रारूप मतदारयादी अशी
-एकूण मतदार : ४२ लाख ४२ हजार ८६८
-८० वर्षांवरील ज्येष्ठ मतदार : १ लाख १९ हजार ३७७
-नवमतदार : ५४ हजार १३२
-दिव्यांग मतदार : १८ हजार ४१९
-पुरुष : २१ लाख ४५ हजार ४८४
-महिला : २० लाख ९७ हजार १०२
यांनी बदलला मतदारसंघ
जिल्ह्यातील १२ मतदारसंघांमधील २२ हजार ५८८ मतदारांनी आपला मतदारसंघ बदलला. शिक्षण, नोकरी वा अन्य कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची नावे मतदारयादीतून हटविण्यात आली आहेत. दक्षिण-पश्चिममध्ये १ हजार ६२५, दक्षिणमध्ये १ हजार ७४९, पूर्वमध्ये १ हजार ७७१, मध्य नागपुरातून १ हजार ४५२, पश्चिम नागपुरातून १ हजार ९७३ आणि उत्तर नागपुरातून २ हजार २६९ मतदारांनी मतदारसंघ बदलल्याची नोंद मतदारयादीत करण्यात आली आहे.