Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३७ हजार मतदार संशयाच्या भोवऱ्यात; सॉफ्टवेअरने शोधले सारखे चेहरे, याद्या अपडेट करताना बाब उघडकीस

9

नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदारयाद्या अपडेट करण्याची मोहीम निवडणूक विभागाकडून राबविण्यात येत आहे. ही यादी अचूक व्हावी, यासाठी सॉफ्टवेअरची मदत घेतली जात आहे. या सॉफ्टवेअरने मतदारयादीतील सारख्या चेहऱ्याच्या जिल्ह्यातील १२ मतदारसंघांतील २९ हजार ९२० मतदारांना शोधून काढले. सारख्या नावाच्या आणि एकाच पत्त्यावर राहत असलेल्या १० हजार ७३६ मतदारांनीही संभ्रम निर्माण केला आहे. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या मतदारांची ओळख पटविण्यासाठी आता ‘बीएलओ’ घरोघरी जाणार आहेत.

-आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मतदारनोंदणी कार्यक्रमाची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता ५ जानेवारीपर्यंत मतदारांना आपली नावे नोंदविता येतील.

-जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ५ जानेवारी रोजी येणारी अंतिम मतदारयादी आता २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

-नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे १२ मतदारसंघ असून ही मतदारसंघनिहाय मतदारयादी अद्ययावत केली जात आहे. ती अद्ययावत करत असताना यादीतील मृत व्यक्तींची नावे गाळण्यात येत आहे.

-मतदारयादी अचूक करण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेरचा वापर करण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरने सारखी दाढी, टोपी यासह चेहऱ्यांवरील इतर खुणांची ओळख पटवून सारख्या चेहऱ्यांचे मतदार शोधून काढले.

शहरातील ‘सेम टू सेम’

पूर्व : ४,२४४
मध्य : १,९००
पश्चिम : १,३१८
उत्तर : ३,२०५
दक्षिण-पश्चिम : १,७९७
दक्षिण : २,७७२
दुबार नोंदणीत पुणेकर अव्वल, निवडणूक आयोगाची आकडेवारी, दुबार छायाचित्रात कोण पुढे?
नावांत, पत्त्यांमध्येही गोंधळ

पूर्व : १,०४०
मध्य : ५१९
पश्चिम : ४५३
उत्तर : १,६८५
दक्षिण पश्चिम : १,१२७
दक्षिण : १,३२५

प्रारूप मतदारयादी अशी

-एकूण मतदार : ४२ लाख ४२ हजार ८६८
-८० वर्षांवरील ज्येष्ठ मतदार : १ लाख १९ हजार ३७७
-नवमतदार : ५४ हजार १३२
-दिव्यांग मतदार : १८ हजार ४१९
-पुरुष : २१ लाख ४५ हजार ४८४
-महिला : २० लाख ९७ हजार १०२

यांनी बदलला मतदारसंघ

जिल्ह्यातील १२ मतदारसंघांमधील २२ हजार ५८८ मतदारांनी आपला मतदारसंघ बदलला. शिक्षण, नोकरी वा अन्य कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची नावे मतदारयादीतून हटविण्यात आली आहेत. दक्षिण-पश्चिममध्ये १ हजार ६२५, दक्षिणमध्ये १ हजार ७४९, पूर्वमध्ये १ हजार ७७१, मध्य नागपुरातून १ हजार ४५२, पश्चिम नागपुरातून १ हजार ९७३ आणि उत्तर नागपुरातून २ हजार २६९ मतदारांनी मतदारसंघ बदलल्याची नोंद मतदारयादीत करण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.