आंबा काजू बोर्डासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॅलो पर्यटन स्थळांसाठी भरघोस निधी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. सिंधुदुर्ग ते मुंबई ग्रीनफिल्ड ॲक्सिस सुपर एक्स्प्रेस मार्गासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची त्यांनी यावेळी माहिती दिली. दापोली तालुक्यात हर्णै येथे उद्योग विभागामार्फत मरीन पार्कची ही घोषणा त्यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प यात्रेच्या आयोजित मेळाव्यात राजापूर येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत,ना.दिपक केसरकर, रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही त्यामुळे प्रत्यक्ष जातो आणि काम सुरू करतो असे सांगत पूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला.

खासदार राजन विचारेंच्या घरी आयकरचा छापा, अपात्रतेच्या तोंडावर ठाकरे गटाचे दोन शिलेदार कात्रीत

स्वच्छता अभियान सुरू केले केवळ मुंबई नाही तर अख्खा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर करू आणि विकासाच्या आड येतील त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईलच असे सांगत खोट्याच्या कपाळी गोटा अशी एक म्हण आहे ती तुम्ही कोकणी माणसं येथे निवडणुकीत खरी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे असाही टोमणा मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला.

मुंबई ठाणे हे शिवसेनेचे शरीर जरी असलं तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही शिवसेनेची दोन फुफ्फुस आहेत असे गौरव उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांच्या विचार आपल्या निवडणूक पूर्व असलेला युती धर्म जनतेच्या भावना लक्षात घेत ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला मला उदय सामंत,दीपक केसरकर यांनीही साथ दिली असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. आम्ही घेतलेल्या निर्णय हा कोणत्याही सत्तेच्या मोहापाई लोभापाई खुर्चीसाठी घेतलेला नव्हता. शिवसेनेच, धनुष्यबाणाच खच्चीकरण होऊ लागलं महाराष्ट्राच्या विकासाच्या विरोधात भूमिका घेऊ लागले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊ लागले आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला असंही शिंदे आणि नमूद केलं. जनभावनेला मुरुड घालत जेव्हा अघटीत घडत होते त्या वेळेला आम्हाला निर्णय घ्यावा लागला. या कोकणाने कोकणी माणसाने शिवसेनेवर बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं. या कोकणी माणसाची नाळ ही बाळासाहेबांच्या विचारांशी जोडलेली आहे विचारांशी बांधिलकी आहे ती या धनुष्यबाणाबरोबर हा शिवसैनिक हिंदुत्ववादी विरोधी शक्तींचा आणि विघ्नसंतोषी लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी ना.दीपक केसरकर,ना.उदय सामंत यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं

Source link

CM Eknath ShindeDeepak Kesarkarmango boardmango kashew boardRatnagiri newsUday Samantमुख्यमंत्री एकनाथ शिंदेरत्नागिरी न्यूज
Comments (0)
Add Comment