जामिनानंतर समर्थकांचा जल्लोष महागात; सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ, विविध कलमांखाली गुन्हा दाखल

नागपूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अतिसंवेदनशील भागांपैकी एक असलेल्या मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात परवानगीशिवाय समर्थक जमा झाले. यासह घोषणाबाजी करत रॅलीही काढण्यात आली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी सुनील केदार आणि त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. १५० कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गुंतवणूक घोटाळ्यात २२ डिसेंबर रोजी नागपूर न्यायालयाने सुनील केदार आणि अन्य पाच आरोपींना शिक्षा सुनावली होती.
स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या नेत्याच्या इशाऱ्यावर ठाकरे कठपुतलीसारखे नाचतात, विखेंची बोचरी टीका
२८ डिसेंबर रोजी सुनील केदारला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ते तुरुंगात होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपुर मध्यवर्ती कारागृह ते संविधान चौक अशी रॅली काढली. विशेष म्हणजे पोलिसांनी यासाठी कोणतीही परवानगी दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांवर विनापरवानगी रॅली काढणे आणि वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात अनेक नक्षलवादी आणि काही दहशतवादी राहतात, असे असतानाही बुधवारी सुनील केदार यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांचे समर्थक कारागृहासमोर जमा झाले. एक दिवसा आधी पोलिसांनी सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांना येथे गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की कारागृह परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. तेथे अशी कृत्ये करू नयेत असे सांगण्यात आले असतानाही केदार यांचा कार्यकर्त्यांनी तेथे जमून घोषणाबाजी केली. केदार तुरुंगातून बाहेर येताच कारच्या सनरूफमधून बाहेर आले.

घाटमाथ्याचं हवामान अन् जमिनीतल्या ओलीवर पिकवला जाणारा ‘हवेवरचा गहू’

कारागृहासमोर कार्यकर्त्यांना अभिवादन केले. त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी थांबवून केदार यांना पुष्पहार घातले. पोलिसांनी अशी सर्व माहिती एफआयआरमध्ये नोंदवली आहे. इतकंच नाही तर बुधवारच्या रॅलीत सहभागी असलेल्या २० हून अधिक चारचाकी वाहनांचा क्रमांकही पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस या गाड्यांचा तपशील तपासत असून या सर्व गाड्या विविध बेकायदेशीर कामात गुंतलेल्या माफियांशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतर सुनील केदारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Source link

Nagpur newssunil kedar bailsunil kedar bookedsunil kedar newssunil kedar supporters bookedनागपूर बातमीसुनील केदार जामीनसुनील केदार जामीन जल्लोशसुनील केदार बातमी
Comments (0)
Add Comment