अमिन पटेल हे मुंबादेवीतील काँग्रेसचे आमदार आहेत. दक्षिण मुंबईतून निवडणूक लवढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी तीन दिवसांपूर्वीच सहा माजी नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या जागेवर उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे, त्यामुळे देवरा यांना संधी मिळत नव्हती. त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. देवरा यांच्या पक्षप्रवेशामुळे दक्षिण मुंबईत काँग्रेसला खिंडारच पडल्याची चर्चा सुरू झाली. देवरा यांनी शिवसेनेतील प्रवेशाचा पुन्हा एकदा विचार करावा, असे आवाहनही मुंबई काँग्रेसकडून करण्यात आले होते. देवरा यांचे काही समर्थकही येत्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते.
त्याचवेळी बुधवारी आमदार पटेल हे महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री केसरकर यांच्यासोबत व्यासपिठावर होते. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही केसरकर यांच्यासोबत होते. त्यामुळे पटेलही शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, माझ्या मतदारसंघातील कामानिमित्त १७ जानेवारीला पालकमंत्र्यांसोबत असलेली बैठक ही पूर्वनियोजित असल्याचे अमिन पटेल यांनी सांगितले. तसेच दहा विद्यार्थिनींना न्युयॉर्क येथील बरो ऑफ मँनहटन कम्युनिटी कॉलेज शिष्यवृती देण्याचे जाहीर केले आहे. त्यासंदर्भातील मुंबई पालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक आमदार म्हणूनही पालकमंत्र्यांनी मला उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चेत तथ्य नसून, मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.