मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा मोर्चा टाळावा, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, जरांगे म्हणाले….

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करताना मोर्चा टाळावा, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे,’ असे शुक्रवारी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा निघणार आहे. २६ तारखेपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आहे. हजारो लोक मुंबईत दाखल होतील, अशी भीती सरकारला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाहन केले आहे. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत. ओबीसी आणि इतर समाजाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत, हा शब्द आम्ही दिलेला आहे. सरकार सकारात्मक असताना आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्यापेक्षा सकारात्मक आणि सामंजस्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

अज्ञातांनी महिलेला रस्त्यात अडवले, श्रीरामाचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

जरांगेंचे उत्तर

शिंदे यांच्या आवाहनाला जरांगे यांनीही उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, शिंदे साहेबांचा शब्द मराठ्यांनी कधीच खाली पडून दिला नाही. खरा दोष त्या मंत्र्यांचा आहे, जे उपोषण सोडण्यासाठी आले होते. त्यांची जबाबदारी होती, प्रश्न सोडवण्याची. पण ते आता कुठे गेले आहेत? आम्ही सामंजस्याची भूमिका किती दिवस घ्यायची. सात महिने त्यामुळेच दिले होते. परंतु आम्ही तरी किती वेळ द्यायचा. समाजाने त्यांच्या शब्दाचा मानसन्मान ठेवला आहे. न्यायासाठी आता आम्ही मुंबईकडे निघणार आहोत, अशी भूमिका जरांगेंनी मांडली.

५४ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा डाटा द्या, आम्ही मुंबईला जाणारच | मनोज जरांगे

Source link

Maratha Reservationmaratha reservation protestmumbai maratha morchamumbai newsएकनाथ शिंदेमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षण आंदोलनमुंबई न्यूजमुंबई मराठा आंदोलन
Comments (0)
Add Comment