कोकणातील दोन तरुणाने केरळ, कर्नाटक राज्यातील मक्तेदारी मोडीत नारळ क्षेत्रातील व्यवसाय केला. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील काळसे गावातील तरुण आणि सावंतवाडीमध्ये राहणारा तरुण या दोन तरूणांनी एकत्र येत व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय यशस्वीपणे २०१५ पासून सुरू आहे. धनंजय राणे यांचं शिक्षण बीई केमिकल झाले आहे. आज धनंजय राणे यांचे मित्र तुषार चव्हाण यांच शिक्षण बीई मेकॅनिकल्स झाले आहे. धनंजय राणे हे २०१५ पासून नारळ क्षेत्रात कार्यरत होते. जिल्ह्यातील नारळापासून काहीच होत नसल्यामुळे यांची उणी राणे यांच्या मनामध्ये कायम होती.
जिल्ह्यातील नारळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यातूनच धनंजय राणे यांच्या लक्षात आलं की आपण नारळापासून बाय प्रॉडक्ट बनू शकतो. अशी संकल्पना त्याच्या मनात उतरली. त्यानंतर मी २०१५ मध्ये खोबरं किसण्याची फॅक्टरी सुरू केली. तत्पूर्वी मी कर्नाटक, केरळ प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणानंतर मशिनरी गावामध्ये येऊन डेव्हलप केल्या. आता माझ्याकडे इलेक्ट्रिक ड्रायर तसेच साधा ड्रायर देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे खोबरं किसण्याची मशीन आहे. या फॅक्टरीमध्ये मूळ उद्देश नारळाच्या खोबऱ्यापासून बनणाऱ्या सर्व बाय प्रोडक्ट बनवले जातात.
त्यामध्ये खोबरं वाटी, खोबरं किस, खोबरेल तेल, खोबऱ्याची पावडर, वरचिग तेल, खोबरा वडी देखील बनवलं जातं. हे सर्व बनविण्यासाठी गावातील महिलांना योग्य प्रशिक्षण दिले गेले आहे. या महिला सर्व खोबरं सुखविण्यापासून आणि इतर प्रॉडक्ट बनविण्यापर्यत काम करतात. परंतु हा व्यवसाय सुरू करत असताना धनंजय राणे आणि तुषार राणे यांनी एकच निर्धार केला होता की, आपण बाहेरून कामगार आणण्यापेक्षा गावातील कामगारांना प्रशिक्षण देऊन आपल्या फॅक्टरी रुजू करावे, अशी संकल्पना त्यांच्या मनी होती. सध्या या फॅक्टरीमध्ये १२ महिला कामगार आणि ३ पुरुष कामगार आहेत. हे १२ ही कामगार आसपासच्या गावातीलचं आहेत.
मूळ नारळातील पाणी बाहेर काढून ड्री हायड्रेशन केल्यानंतर मूळ प्रॉडक्ट बनवले जातात. प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणार रॉ मटेरियल जिल्ह्यातील सर्वाधिक प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे लागणार रॉ मटेरियल जिल्ह्यातून मिळत. बांदा, मालवण, कुडाळ, देवगड या तालुक्यातून आणलं जाते. शेतकरी फॅक्टरीपर्यत पोच करतात. मात्र या व्यवसायातून जवळपास ७० लाख टन एवढा वर्षाचा टनवर्क आहे. त्यामध्ये १५ ते १६ लाखापर्यंत निव्वळ नफा मिळतो. कोकणातलं खोबऱ्याचं प्रॉडक्ट असल्यामुळे सुरुवातीला सिंधुदुर्गातच मार्केटिंग केलं.
जिल्ह्यातील जी महत्वाची शहर आहेत. त्या शहरांमध्ये सुरुवातीला प्रॉडक्ट लॉंच केलं. त्यामुळे हॉटेल, किराणा दुकाने, जनरल दुकान, सुपर मार्केट अशा दुकानदारांना दिलं. सुरुवातीला सुखं खोबऱ्यापासून मार्केटमध्ये टार्गेट करून ठेवलं. मात्र मार्केटमध्ये वावरत असतानाच सुरुवातीला सुखं खोबरं केरळ आणि कर्नाटकमधून कोकणात येत. ते आम्हाला केरळ, कर्नाटक व्यवसायिक प्रतिस्पर्धी दराबद्धल वाटू लागले. त्यामुळे आम्ही “शेडेट खोबरं किस” प्रॉडक्ट लॉंच केला. या प्रॉडक्टने महाराष्ट्राभर गती घेतली आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी खोबरं किस मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
सध्या तर किराणा दुकानदाराना टार्गेट केलं असून भविष्यात हॉटेल व्यवसयिकांना खोबरं किस देण्याच्या प्रयत्नात आहोत. जिल्ह्यातील सुरुवातीला “मालवणी खोबरं “म्हणून प्रसिद्ध केलं. कर्नाटक, केरळच खोबरं जिल्ह्यात विकलं जात नाही. जो नारळ कोकणात तयार होतो त्याच नारळाचं किस मार्केटमध्ये विकला जातो. जसा मालवणी मसाला म्हणून कोकणात प्रसिद्ध आहे तसंच “मालवणी खोबरं किस” म्हणून विकत आहे. त्यालाही विशिष्ट चव आहे. त्यामुळे कोकणातील लोक मुंबई, पुणे या भागात असल्यामुळे आम्ही त्याचं भागांमध्ये खोबरं पाठवितो. २०१५ पासून नारळ क्षेत्रात काम करत असताना नारळ, खोबरं, काथा असं कधीच ग्रो केला जाऊ शकत नाही. तर संपूर्ण झाड ग्रो केला पाहिजे. आगामी काळात नारळापासून फ्रूड बनविण्याच्या संकल्पनेत आहोत, असं तुषार चव्हाण यांनी सांगितलं.