लक्ष्मीनगर, पुसेसावळी गावच्या पूजा वंजारी म्हणजेच पूजा माळवे यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. वाळवा) आहे. कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतलेल्या पूजा यांनी २०१५ मध्ये स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. खासगी कंपनीत नोकरी करण्यापेक्षा लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू होऊन समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. आता त्या उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू होणार असून यशदा पुणे येथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. २०१५ पासून त्या स्पर्धा परीक्षा देत होत्या. २०२० मध्ये पाचव्या प्रयत्नात त्यांची सहायक निबंधक या पदावर निवड झाली होती. त्यानंतर सातव्या प्रयत्नात त्यांनी उपजिल्हाधिकारीपदी बाजी मारली.
भूषण यांनी कराड येथील शासकीय महाविद्यालयातून इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळवली आहे. गेली सात वर्षे ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. एमपीएससी परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे. यूपीएससी हे त्यांचे ध्येय असून, आजपर्यंत त्यांनी पाचवेळा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
भूषण यांचे मूळ गाव भरतगाव असून, सध्या सातारा येथील विलासपूरमध्ये राहात आहेत. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल येथे पूर्ण केल्यानंतर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिलमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचा संकल्प भूषण यांनी लहानपणीच केल्याने त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी सुरुवातीला दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा दोन वर्ष अभ्यास केला. त्यानंतर पुणे येथे अभ्यास करण्यास सुरुवात केली. राज्यसेवेच्या २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. या परीक्षेत चांगली रॅक मिळवीत वर्ग एक पदाला भूषण यांनी गवसणी घातली.
भूषण यांचे वडील माणिकराव कदम हे सैन्य दलात सुभेदारपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. भाऊ शुभम पुणे येथे एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. भूषण कदम याने मिळविलेल्या यशाचे श्रेय आई – वडील व कुटुंबाला दिला आहे.
विरमाडे येथील विनय अशोक सोनावणे यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. विनय यांचे प्राथमिक शिक्षण विरमाडे, माध्यमिक शिक्षण उडतारे व महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे झाले आहे. सध्या स्कील डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून ते प्रशिक्षण घेत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News