अयोध्येला न जाणारे बिनकामाचे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता टीकास्त्र

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘राम लला हम आयेंगे, भव्य मंदिर बनायेंगे…… ही घोषणा आता खरी ठरली आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलला अयोध्येत विराजमान होणार आहेत. या आनंदाच्या क्षणी अयोध्येला न जाण्याचा निर्णय काहींनी घेतला. रामाचे अस्तित्व नाकारणारे हे लोक बिनकामाचे आहेत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता टीकास्त्र सोडले.

हिंदू रक्षा समितीच्यावतीने महाल येथील पंडित बच्छराज व्यास चौकात शनिवारी श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला. रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेले देवेंद्र फडणवीस यांचा गदा देऊन सत्कार करण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक श्रीराम जोशी यांनाही सन्मानित करण्यात आले. संजय शिरपूरकर, सुनील काबरा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

कारसेवकांच्या आठवणींना फडणवीस यांनी यावेळी उजळा दिला. ‘६ डिसेंबर १९९२ रोजी सकाळी सर्व कारसेवक एकत्र जमले. कलंकाचा ढाचा खाली येणार, असा निर्धार करूनच सर्व एकवटले होते. ढाचा खाली आला आणि मंदिरही तयार झाले. ‘रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे…’ अशी घोषणा देण्यात येत होती, ती आता खरी करून दाखविली. आता अयोध्येत भव्य मंदिर तयार झाले आहे.’
बाबरी मशिद पाडली तेव्हा रामलल्लांची मूर्ती कोठे होती? पुणेकर जोशींचं काय योगदान? जाणून घ्या
अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्यांवर फडणवीस यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. २००७मध्ये काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. ‘राम काल्पनिक आहे, रामसेतू अस्तित्वातच नाही’, असे त्यांचे म्हणणे होते, असे सांगत, ‘जो राम का नही, वह किसी का नही’… अशी घोषणाही फडणवीस यांनी यावेळी दिली. २२ जानेवारीनंतर सर्वांनी अयोध्येला जाऊन दर्शन घ्यायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जागो तो एक बार हिंदू जागो रे…

प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांनी ‘बोलो जय जय सियाराम’, ‘अयोध्या आये मेरे राम’, ‘शिव शिव शिव शिव शंभो’, ‘लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा… शिव भोला भंडारी…’, ‘मंगल भवन अमंगल हारी…’ यांसारखी गीते गाऊन वातावरण भक्तिरस भरला. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत नागरिकांनीही परिसर दुमदुमून सोडला. वातावरणात उत्साह भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही ‘जागो तो एक बार हिंदू जागो रे’… हे गीत सादर केले. उपस्थितांकडून या गीतांना उत्स्फूर्द दाद मिळाली.

Source link

ayodhya ram mandirDeputy chief ministerDeputy Chief Minister Devendra FadnavisDevendra FadnavisNagpur newsramlalla temple
Comments (0)
Add Comment