वैभववाडीत उद्धव ठाकरे गटाला धक्का; नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात

सिंधुदुर्ग: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशीच उबाठा गटाला आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. वैभववाडीत उद्धव ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाचे वैभववाडीतील आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले आहेत. राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पक्षप्रवेश झाला असून आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले आहे.
तलाठी भरती घोटाळ्यावरून काँग्रेस आक्रमक, दादर स्थानकात लोकल अडवली, रेल्वेचा खोळंबा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभववाडी नगरपंचायत नगरसेविका दर्शना पवार, माजी नगराध्यक्षा दीपा गजोबार, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवक वार्ड अध्यक्ष अशा वैभववाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. दोनच दिवसांपूर्वी नेर्ले आणि भोम या गावातील असंख्य उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरचा हा मोठा दुसरा प्रवेश आहे. त्यांना राणेंच्या नेतृत्वात काम करायचे आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कट्टर शिवसैनिक म्हणून नारायण राणे यांनी काम केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आम्ही उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रवेशाची परतफेड केली पाहिजे असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. तसेच वैभववाडी शहराच्या विकासात आणि सामाजिक वाटचालीत एक विधायक दृष्टिकोन ठेवून या सर्वांनी प्रवेश केलेला आहे. येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात वैभववाडीचा विकास साधण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत, असे नितेश राणे म्हणाले.

मोदींचा डायलॉग ऐकवला, रोहिणी खडसेंचं वॉशिंग मशीन म्हणत भाजपवर टीकास्त्र

यावेळी नितेश राणे यांनी नगरसेविका दर्शना संतोष पवार, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष दीपा गजोबार, माजी नगरसेवक संतोष पवार, माजी नगरसेवक रवींद्र तांबे, दीपक गजोबार, आदित्य चव्हाण, वार्ड अध्यक्ष राजेंद्र गजोबार, श्रेयस नेवरेकर, उत्तम निकम, गोपाळ नगर अध्यक्ष संतोष निकम आदींसह शेकडो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात स्वागत केले. यावेळी भाजपचे वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे, बँक संचालक दिलीप रावराणे, एडगांव सोसायटी चेअरमन सुनील रावराणे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Source link

activists join partynitesh rane newssindhudurg newsUddhav Thackeray newsvaibhavwadi activists join partyउद्धव ठाकरे बातमीकार्यकर्ते पक्षप्रवेशनितेश राणे बातमीवैभववाडी कार्यकर्ते पक्षप्रवेशसिंधुदुर्ग बातमी
Comments (0)
Add Comment