ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे सविस्तर तपशील मूळ अधिसूचनेत दिले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे.
वयोमर्यादा :
यासाठी अर्ज करणारे उमेदवाराचे वय 0जानेवारी 2024 रोजी जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची तर एससी/एसटी वर्गाला ५ वर्षांची सवलत आहे.
मिळणार एवढा पगार :
ही भरती प्रक्रिया १३० रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार २० हजारांहून अधिक पगार दिला जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता :
या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण चेन्नई आणि मुंबई असून उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
चेन्नई : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई ६०००४३.
मुंबई : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सीएसएमआय विमानतळ, सीआयएसएफ गेट नंबर ५ जवळ, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९
या पत्त्यावर मुलाखतीसाठी ०१, ०२ आणि ०३ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत उपस्थित राहायचे आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क म्हणून जनरल/ओबीसी साठी 500 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे तर SC/ST/ExSM साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.
या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.