‘फाइटर’ने २२.५ कोटींची ओपनिंग करून दमदार सुरुवात केली. शुक्रवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ४० कोटींहून थोडी कमी ३९.५ कोटींची कमाई केली. यानंतर, शनिवार आणि रविवारी त्याची कमाई कमी झाली, परंतु सुरुवातीच्या तुलनेत चांगली होती. sacnilk च्या मते, चित्रपटाने शनिवारी २७.५ कोटी रुपये कमावले होते, तर रविवारी २८.५० कोटी रुपये कमावले.
देशभरातील कमाई १०० कोटी ओलांडले
यासोबतच या चित्रपटाने देशभरात १०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. ‘फाइटर’ने एकूण ४ दिवसांत ११८.०० कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘फाइटर’ने जवळपास १८० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १५० कोटींहून अधिक कमाई केली होती.
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय आणि ऋषभ साहनी यांसारखे तगडे कलाकार आहेत. मुख्य स्टार कास्टची जबरदस्त केमिस्ट्री आणि उत्कृष्ट एरियल ॲक्शन सीन्समुळे हा चित्रपट लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट देशभरातील सुमारे ४३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.