संशयाच्या भुताने झपाटले, लखनऊवरुन थेट पुणे गाठले, हिंजवडी इंजिनिअर हत्याकांडाची A टू Z स्टोरी

पुणे : संशय म्हंटला की एकमेकांबद्दल असणारा आदर, भावना, विश्वास याला तडा जाणे. यातूनच अनेकदा टोकाचे निर्णय घेऊन आयुष्य उध्दवस्त होतं. अशा घटनांमुळे समाजात देखील वेगळा संदेश जातो. अशाच संशयाचं भूत लखनऊ येथे राहणाऱ्या ऋषभ निगम नावाच्या तरुणाच्या डोक्यात शिरलं. त्याने गेल्या काही वर्षांपासून सोबत असणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गोळ्या झाडून खून केला. यामुळे तिचं तर आयुष्य संपलंच, पण स्वतःच्या आयुष्याची देखील ऋषभने वाट लावून घेतली.

वंदना द्विवेदी आणि ऋषभ निमग हे दोघेही लखनऊमध्ये राहणारे. कॉलेज जीवनापासून ते एकमेकांना चांगले ओळखायचे, त्यानंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. मात्र, कॉलेज संपल्यानंतर वंदना हिने अभियांत्रिकी सॉफ्टवेअरचे शिक्षण पूर्ण केले तर ऋषभ हा लखनऊमध्येच काम करत होता. वंदना हिला पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्यामुळे ती पुण्यात नोकरीसाठी दाखल झाली. तरी देखील वंदना आणि ऋषभ यांच्यातील नाते चांगले होते. दोघेही चांगले संपर्कात होते.
दिवसभर फिरले, जेवले, रुमवर गेले अन्… पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या हत्येमागील धक्कादायक सत्य
वंदना ही आयटी कंपनीत काम करत असल्याने तिला कामातून वेळ मिळत नसे. त्यामुळे ऋषभसोबत बोलणेही कमी होत असे. या सर्व गोष्टींचा विचार ऋषभने न करता त्याने ”वंदनाला पुण्याला गेल्यावर कुणी दुसरा तर भेटला नाही ना”, अशी संशयाची सुई त्याच्या मनात चुकचुकू लागली. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. जवळपास चार वर्ष त्यांच्यात भांडण होत होती.

अखेर ऋषभ हा २५ जानेवारी रोजी लखनऊवरून पुण्यात आला. त्याने हिंजवडी भागात एका हॉटेलमध्ये रुम देखील बुक केली. त्यानंतर त्याने वंदना हिला भेटण्यासाठी बोलावले. मात्र, ती कामात असल्याने ती २६ जानेवारी या दिवशी ऋषभ याला भेटायला गेली. त्याची भेट घेतली आणि ती पुन्हा रूमवर गेली, मुक्कामी थांबली नाही. या गोष्टीचा ऋषभला राग आला असावा. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी वंदनाला पुन्हा भेटण्यासाठी बोलावले. त्या दिवशी ते बाहेर फिरण्यासाठी गेले. शॉपिंग, जेवण, संपूर्ण वेळ एकमेकांसोबत घालवला.

संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवल्यानंतर ते पुन्हा ऋषभ राहत असलेल्या रूमवर आले. वंदनाला ऋषभच्या मनात काय सुरु आहे याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्याच्या मनात किती राग आहे हे त्याने देखील दाखवले नाही. घरी आल्यानंतर वंदना आतमध्ये गेल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या डोक्यात आणि अंगावर एका मागोमाग एक अशा पाच गोळ्या झाडल्या. सलग पाच गोळ्या लागल्याने वंदना ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. समोरचे दृश्य पाहून त्याला जराही पश्चात्ताप झाला नव्हता. अशी परिस्थिती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. हा सर्व प्रकार केल्यानंतर त्याने चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न आणता अगदी शांततेत तो घरातून बाहेर पडला आणि मुंबईच्या दिशेने निघून गेला. आजूबाजूच्या कुणालाही याबाबत काही माहीत नसल्याचे देखील समोर आलं आहे.

ऋषभ ज्यावेळी हिंजवडीतून नवी मुंबईत पोहोचला. त्यावेळी मुंबई पोलीस नाकाबंदी करत होते. त्यामुळे प्रत्येकाची तपासणी केली जात होती. पोलीस ऋषभपर्यंत पोहोचले. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याची चेकिंग सुरु केली. चेकिंग करत असताना पोलिसांना त्याच्याकडे पिस्तूल सापडली. पिस्तुल कुठून आली असा प्रश्न पोलिसांनी विचारताच त्याचा चेहरा कावराबावरा झाला. तिथेच त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

प्रेमात एकामेकावर विश्वास असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यात एकमेकांना समजून घेणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. मात्र, नात्यात संशय आला तर असे टोकाचे निर्णय घेतले जातात आणि आयुष्य उध्दवस्त केले जाते. हेच या हिंजवडी मर्डर प्रकरणावरून समोर येत आहे. ऋषभच्या संशयी स्वभावामुळे अनेक वर्षांपासून असणाऱ्या प्रेमाच्या नात्याचा अत्यंत वाईट शेवट झाला.

पुण्यात गर्लफ्रेण्डला गोळ्या घातल्या, मग हॉटेल रुमचं दार बंद करुन शांतपणे निघाला, भयंकर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज

Source link

hinjewadi female engineer murder storyPune crime newspune hinjewadi female engineer murderPune Policeपुणे क्राइम बातम्यापुणे पोलीसपुणे हिंजवडी महिला इंजिनिअर हत्याहिंजवडी महिला इंजिनिअर हत्या स्टोरी
Comments (0)
Add Comment