देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसतात, भुजबळांनी सत्य अधोरेखित केले: सुधीर मुनगंटीवार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:‘ओबीसीं’चे नेते छगन भुजबळ यांनी देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसल्याचे सत्यच अधोरेखित केले आहे. त्यामुळे ते वातावरण दूषित करीत आहेत असे म्हणता येणार नाही, असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नाशिकमध्ये व्यक्त केले.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे कुठलाही तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता सरकार एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पर्यायांवर एकतर्फी कार्यवाही करीत असल्याबाबत भुजबळ यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली होती. असे केल्याने ‘ओबीसीं’च्या शिक्षण, नोकरी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणात मराठा समाज वाटेकरी होणार असल्याची चिंताही व्यक्त होऊ लागली असल्याकडे मुनगंटीवार यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत मुनगंटीवार म्हणाले, की भुजबळ ‘ओबीसीं’च्या न्याय्य मागण्यांसाठी बोलत आहेत. कुणबीचे पुरावे असतील, तर कायद्याने दाखला मिळतो. ‘ओबीसीं’मधून सरसकट आरक्षण दिले जाऊ नये, असा भुजबळांचा मुद्दा असून, त्यांच्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील स्पष्ट केले आहे. राजकारणात असे प्रसंग आल्यास संयम बाळगून वस्तुनिष्ठ माहिती लोकांना दिली, तर दूषित वातावरण निर्माण होणार नाही, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार, मोर्चाचा मार्ग आणि नियोजनासाठी समिती स्थापन

‘टुकडे हुए हजार…’

‘इंडिया आघाडी’ची सध्या ‘टुकडे हुए हजार…’ अशी अवस्थ झाली आहे. एक भाऊ, आई आणि बहीण एकत्र राहिले, तरी ‘इंडिया आघाडी’ टिकेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढणार असल्याकडे मुनगंटीवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर महाराजांनी राजकारणात यावे, पण राजकारण्यांनी महाराज होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ओबीसींवर अन्याय झाला नाही, भुजबळांच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, तायवाडेंचा पलटवार

Source link

chhagan bhujbalNashik newsOBC reservationsudhir mungantiwarओबीसी आरक्षणछगन भुजबळनाशिक न्यूजसुधीर मुनगंटीवार
Comments (0)
Add Comment