माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला सकट चौथचे व्रत केले जाते. आजच्या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते आणि त्यांच्या आनंदासाठी श्रीगणेशाची पूजा करते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. रात्री चंद्राला अर्घ्य देतात आणि मुलांसाठी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात या व्रताला तिलवा आणि तिलकुटा असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया सकट चौथचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी.
‘सकट चौथ’चा शुभ मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील सकट चौथ आज असून सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाले आहे. ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी समारोप होईल.
‘सकट चौथ’चा शुभ मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील सकट चौथ आज असून सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाले आहे. ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी समारोप होईल.
‘सकट चौथ’चे महत्त्व
‘सकट चौथ’ म्हणजे संकट दूर करणारी गणेश चतुर्थी असे म्हटले जाते. गणपतीला विघ्नहर्ता असे म्हणतात, त्यामुळे सकट चौथच्या दिवशी उपवास केल्यामुळे आयुष्याचील संकटे आणि अडथळे दूर होते अशी मान्यता आहे. या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांसाठी उपवास आणि व्रत कथा महत्त्वाची मानली जाते. या कथेचे पठण केल्यानंतरच व्रत पूर्ण मानले जाते.
‘सकट चौथ’ व्रत विधी
‘सकट चौथ’च्या दिवशी महिला सकाळी आंघोळ करून उपवास करतात. रात्री चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जातो. काही ठिकाणी स्त्रिया आजच्या दिवशी काहीही खात नाहीत. काही ठिकाणी महिला उपवास सोडल्यानंतर खिचडी, शेंगदाणे आणि फलाहार करतात. या दिवशी रताळे खाणे सर्वात महत्वाचे आहे. या व्रतात काळे तीळ आणि गुळापासून बनलेले खाद्यपदार्थ, तांदूळाचे पीठ असा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो.