भ्रष्टाचार करा भाजपात या, क्लीन चिटची मोदींची गॅरंटी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

रायगड: जिल्हा दौऱ्यावर आलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघात या वेळेला मला वाटत नाही जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे. कारण गेल्या वेळेला रायगडने ताठ मानेने मोदींविरोधात त्यांनी मतदान केलं होतं. यावेळेला प्रचंड स्तुनामी आल्यासारखं मतदान रायगडमध्ये मोदींच्या विरोधात हुकूमशाहीच्या विरोधात मतदान होणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

रायगड जिल्हा दौऱ्यात त्यांनी मोदी, भाजपा या मुद्द्यावरून टीका करत तटकरे यांनाही लक्ष केलं आहे. मागच्या वेळेला शिवसेनेचे कार्यक्रमासाठी आले असताना मी शरद पवार यांच्या शेजारी बसलो होतो. त्या वेळेला त्यांनी मला सांगितलं की, या गद्दाराला गाडायचं असं सांगत थेट विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनाही ठाकरे यांनी लक्ष केलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले – हा आत्मविश्वास देणारा संकल्प…
निवडून दिलेल्या खासदाराला आदिती तटकरे यांना भाजपने जाहीर करावं की यांना आम्ही तिकीट देणार नाही. कारण ही घराणेशाही आम्ही बंद करणार. हिम्मत असेल तर विरोध करा, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ना राज्यसभेत पाठवणार ना विधानसभेत पाठवणार. कारण अशी ही कुजबुज आहे, त्यांना आता कळलं आहे की लोकसभेत निवडून येऊ शकत नाही. मग मागच्या दारातून पुन्हा तटकरे राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांना मोदींनी सांगायला हवे ‘गेट आउट’ मला घराणेशाही चालणार नाही, असं ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पालकमंत्री वगैरे काही असेल तर तू आणि तुझी मुलगी घरी काय ते करा. पक्षात स्थान नाही. ही घराणेशाही बाहेर काढा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी तटकरे आणि भाजपला सुनावलं आहे. रायगड जिल्हा मोदी लाटेत गेल्यावेळी वाहून गेला नव्हता. मात्र आता जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला. पण माझा रायगड तसाच आहे आणि आता रायगडकर खूश झाले आहेत. कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी गेल्या वेळेला केलं होतं. आता तर आपण केवळ मोदींच्या विरोधात नाही तर हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत, असे शब्दात त्यांनी सुनील तटकरे यांच्याबरोबरच भाजपचाही समाचार घेतला आहे.

रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी, कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी काय केलं पाहा

ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधत भ्रष्टाचार करा भाजपात या, क्लीन चिटची मोदी गॅरंटी आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. या वेळेला गीते साहेबांनी ही माझी थोडी पंचायत केली. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार सांगत मी पंतप्रधान पदाचा स्वप्न बघू की नको असाही मला प्रश्न पडला आहे, असं मिश्किलपणे सांगत मला कोणत्याही पदाची स्वप्न पडत नाहीत. पडली ही नव्हती मला फक्त दिसतो आहे तो माझा महाराष्ट्र, माझा देश आणि माझी भारत माता, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Source link

sunil tatkare newsUddhav Thackeray newsuddhav thackeray on bjpuddhav thackeray on narendra modiuddhav thackeray on sunil tatkareउद्धव ठाकरे टीकाउद्धव ठाकरे बातमीरायगड बातमीसुनील तटकरे बातमी
Comments (0)
Add Comment