Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रायगड जिल्हा दौऱ्यात त्यांनी मोदी, भाजपा या मुद्द्यावरून टीका करत तटकरे यांनाही लक्ष केलं आहे. मागच्या वेळेला शिवसेनेचे कार्यक्रमासाठी आले असताना मी शरद पवार यांच्या शेजारी बसलो होतो. त्या वेळेला त्यांनी मला सांगितलं की, या गद्दाराला गाडायचं असं सांगत थेट विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनाही ठाकरे यांनी लक्ष केलं आहे.
निवडून दिलेल्या खासदाराला आदिती तटकरे यांना भाजपने जाहीर करावं की यांना आम्ही तिकीट देणार नाही. कारण ही घराणेशाही आम्ही बंद करणार. हिम्मत असेल तर विरोध करा, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ना राज्यसभेत पाठवणार ना विधानसभेत पाठवणार. कारण अशी ही कुजबुज आहे, त्यांना आता कळलं आहे की लोकसभेत निवडून येऊ शकत नाही. मग मागच्या दारातून पुन्हा तटकरे राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांना मोदींनी सांगायला हवे ‘गेट आउट’ मला घराणेशाही चालणार नाही, असं ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, पालकमंत्री वगैरे काही असेल तर तू आणि तुझी मुलगी घरी काय ते करा. पक्षात स्थान नाही. ही घराणेशाही बाहेर काढा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी तटकरे आणि भाजपला सुनावलं आहे. रायगड जिल्हा मोदी लाटेत गेल्यावेळी वाहून गेला नव्हता. मात्र आता जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला. पण माझा रायगड तसाच आहे आणि आता रायगडकर खूश झाले आहेत. कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी गेल्या वेळेला केलं होतं. आता तर आपण केवळ मोदींच्या विरोधात नाही तर हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत, असे शब्दात त्यांनी सुनील तटकरे यांच्याबरोबरच भाजपचाही समाचार घेतला आहे.
ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधत भ्रष्टाचार करा भाजपात या, क्लीन चिटची मोदी गॅरंटी आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. या वेळेला गीते साहेबांनी ही माझी थोडी पंचायत केली. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार सांगत मी पंतप्रधान पदाचा स्वप्न बघू की नको असाही मला प्रश्न पडला आहे, असं मिश्किलपणे सांगत मला कोणत्याही पदाची स्वप्न पडत नाहीत. पडली ही नव्हती मला फक्त दिसतो आहे तो माझा महाराष्ट्र, माझा देश आणि माझी भारत माता, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.