अॅपवरील Spam शोधण्यासाठी ‘Deception Detector’ आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केला जातो आणि फेक प्रोफाईलची ओळख केली जाते. ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत फेक अकाऊंट कमी झाले आहेत. ऑनलाइन डेटिंगबद्दल हाच एक मोठा वाद प्रत्येकवेळी उफाळून येतो की अॅपच्या माध्यमातून डेटिंग करणं सुरक्षित नाही. फेस प्रोफाईल आणि रिस्क स्कॅम एक कॉमन समस्या बनली आहे. भारतात सुमारे २९ टक्के लोकांना पर्सनल डेटा सुरक्षित राहील की नाही याची काळजी वाटते.
तर सुमारे २८% लोकांना मीटिंग आणि डेटिंग दरम्यान सुरक्षा सर्वात मोठा असतो. त्यामुळे अनेकदा लोकांना भेटायला देखील युजर्स घाबरतात. Bumble कडे सतत अश्या तक्रारी येतात. ‘Deception Detector’ च्या मदतीनं फेक प्रोफाईलवर कारवाई करणे सोपं होईल आणि Bumble वर सेफ कनेक्शन बनवण्यास मदत मिळेल.
Bumble द्वारे याची टेस्टिंग देखील करण्यात आली आहे आणि सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत हे अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकतात. AI Based टेक्नॉलॉजीचा वापर आता लोकांच्या सुरक्षेसाठी देखील केला जात आहे. Bumble की CEO Lidiane Jones यांनी म्हटलं आहे की, “येत्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन डेटिंग अॅपचा ट्रेंड मोठा झाला आहे परंतु याच्या ऑथेंटिसिटीचा मु्द्दा देखील वाढत आहे. आमच्या अॅपवर तुम्हाला Genuine कनेक्शनच मिळतील अशी खात्री आम्हाला युजर्सना द्यायची आहे आणि त्यामुळे आम्ही ‘Deception Detector’ चा ऑप्शन घेऊन आलो आहोत.”