Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्हॅलेंटाइन निमित्त Bumble नं केली नव्या AI टूलची घोषणा; पार्टनर शोधणे आता होणार जास्त सेफ

8

Dating App ची जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा त्यावर होणाऱ्या फसवणुकीच्या बातम्या देखील समोर येतात. अनेकवेळा अश्या बातम्या आल्या आहेत की डेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. याचा विचार करून Bumble नं एक नवीन फीचर आणलं आहे. याला कंपनीनं ‘Deception Detector’ चं नाव दिलं आहे. गेली अनेक दिवस Bumble युजर्सची सेफ्टीवर काम करत आहे. ज्यामुळे तुम्हाला या अ‍ॅपवर ऑथेंटिक कनेक्शन सर्च करण्यास मदत होईल.

अ‍ॅपवरील Spam शोधण्यासाठी ‘Deception Detector’ आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केला जातो आणि फेक प्रोफाईलची ओळख केली जाते. ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत फेक अकाऊंट कमी झाले आहेत. ऑनलाइन डेटिंगबद्दल हाच एक मोठा वाद प्रत्येकवेळी उफाळून येतो की अ‍ॅपच्या माध्यमातून डेटिंग करणं सुरक्षित नाही. फेस प्रोफाईल आणि रिस्क स्कॅम एक कॉमन समस्या बनली आहे. भारतात सुमारे २९ टक्के लोकांना पर्सनल डेटा सुरक्षित राहील की नाही याची काळजी वाटते.

तर सुमारे २८% लोकांना मीटिंग आणि डेटिंग दरम्यान सुरक्षा सर्वात मोठा असतो. त्यामुळे अनेकदा लोकांना भेटायला देखील युजर्स घाबरतात. Bumble कडे सतत अश्या तक्रारी येतात. ‘Deception Detector’ च्या मदतीनं फेक प्रोफाईलवर कारवाई करणे सोपं होईल आणि Bumble वर सेफ कनेक्शन बनवण्यास मदत मिळेल.

Bumble द्वारे याची टेस्टिंग देखील करण्यात आली आहे आणि सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत हे अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकतात. AI Based टेक्नॉलॉजीचा वापर आता लोकांच्या सुरक्षेसाठी देखील केला जात आहे. Bumble की CEO Lidiane Jones यांनी म्हटलं आहे की, “येत्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपचा ट्रेंड मोठा झाला आहे परंतु याच्या ऑथेंटिसिटीचा मु्द्दा देखील वाढत आहे. आमच्या अ‍ॅपवर तुम्हाला Genuine कनेक्शनच मिळतील अशी खात्री आम्हाला युजर्सना द्यायची आहे आणि त्यामुळे आम्ही ‘Deception Detector’ चा ऑप्शन घेऊन आलो आहोत.”

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.