28000mAh Battery असलेला फोन
सर्वप्रथम एवढी अवाढव्य बॅटरी असलेल्या फोनचे नाव जाणून घेऊया. २८,०००एमएएचची राक्षसी बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे नाव Energizer P28K असेल. फोनच्या नावातील पी२८के म्हणजे २८ हजारांची पावर असा आहे. हा मोबाइल Energizer ब्रँड द्वारे लाँच केला जाईल. विशेष म्हणजे कंपनीनं याआधी देखील असे मोठी बॅटरी असलेले मोबाइल फोन टेक मंचावर सादर केले आहेत. विशेष म्हणजे कंपनीनं काही वर्षांपूर्वी १८०००एमएएचची बॅटरी असलेला फोन लाँच केला होता ज्याचे नाव Energizer P18K असं होतं.
कधी लाँच होईल Energizer P28K
कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की या महिन्याच्या अखेरीस म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी आयोजित होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड कांग्रेस (Mobile World Congress 2024) मध्ये सहभाग घेणार आहे. Energizer P28K स्मार्टफोन २६ फेब्रुवारीला MWC 2024 मध्ये लाँच होईल. हा ब्रँड भारतात उपलब्ध नाही त्यामुळे एनर्जाइजर पी२८के स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार नाही. तुम्हाला हा फोन आयात करूनच वापरता येईल.
Energizer P28K चे स्पेसिफिकेशन्स
मोठ्या बॅटरीसह हा मोबाइल फोन मोठी स्क्रीन आणि पावरफुल कॅमेरा अश्या फीचर्ससह देखील येतो. मिळालेल्या माहितीनुसार एनर्जाइजर पी२८के मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले मिळेल जो फुलएचडी पिक्सल रिजोल्यूशनवर चालेल. फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार याच्या बॅक पॅनलवर ६० मेगापिक्सल मेन सेन्सर तसेच २० मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Energizer P28K मध्ये १६ मेगापिक्सल फ्रंट दिला जाऊ शकतो.