Vivo Y200e 5G ची किंमत
Vivo Y200e 5G दोन ऑप्शनमध्ये येतो, ज्यात ६जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज आणि ८जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज आहे. दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे १९,९९९ रुपये आणि २०,९९९ रुपये आहे. हे दोन कलरमध्ये येतात, ज्यात ब्लॅक डायमंड आणि सॅफ्रन ऑरेंजचा समावेश आहे. Y200e 5G आता भारतात विवो इंडिया वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. हा २७ फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
Vivo Y200e 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y200e 5G मध्ये ६.६७ इंचाचा सॅमसंग E4 AMOLED डिस्प्ले आहे, जो सेंट्रली पोजिशन पंच-होलसह आहे. हा एफएचडी+ रिजोल्यूशन, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३९४पीपीआय पिक्सल डेंसिटी, १२०० निट्स पीक ब्राइटनेस आणि एक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो. यात कंपनीनं ड्युअल स्पिकरचा समावेश केला आहे. डिव्हाइसच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा बोकेह लेन्स, एक फ्लिकर सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश आहे. तसेच, Vivo Y200e 5G मध्ये १६-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
स्नॅपड्रॅगन ४ जेन २ वर चालणार हा डिवाइस ८ जीबी पर्यंत एलपीडीडीआर४एक्स रॅम, ८ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम आणि १२८ जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसह येतो. फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी आहे जी ४४वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिवाइस अँड्रॉइड १४ वर आधारित फनटच ओएस १४ सह प्रीलोडेड येतो. डिवाइस ड्युअल सिम, ५जी, वाय-फाय ८०२.११एसी, ब्लूटूथ ५.०, जीपीएस आणि एक यूएसबी-सी पोर्ट सारखे ऑप्शन देतो. यात आयपी५४-रेटेड डस्टप्रूफ आणि वॉटर-रेसिस्टेंट चेसिस आहे