Apple iPhone 14 चा १२८जीबी स्टोरेज मॉडेल तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या फोनची एमआरपी ६९,९०० रुपये आहे परंतु हा फोन इथे १८ टक्के डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा आयफोन ५६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. परंतु हा डिस्काउंट यावरच थांबत नाही, तर ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. बँक ऑफ बरोडाच्या कार्डने EMI ट्रँजॅक्शन केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. यासाठी मर्यादा १५०० रुपयांपर्यंत आहे.
हे देखील वाचा:
CITI Credit Card EMI Transaction वर देखील थेट १० टक्क्यांची सूट दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर नंतर हा फोन तुम्हाला आणखी स्वस्तात मिळू शकतो. जुना फोन फ्लिपकार्टला परत दिल्यास ४४ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु यासाठी तुमच्या जुन्या फोनची कंडिशन चांगली असावी आणि तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल नंबरवर देखील ही सूट अवलंबून असेल. जर तुम्हाला हा डिस्काउंट मिळाला तर iPhone 14 १३ हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल.
iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स
एक वर्ष जुन्या फोनचे स्पेसिफिकेशन पाहता ह्यात ६.१ इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप देखील मिळतो ज्यात १२ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. फ्रंट कॅमेरा देखील १२ मेगापिक्सलचा आहे. प्रोसेसर पाहता फोनमध्ये ए१५ Bionic Chip मिळते म्हणजे फोनच्या स्पीडची जास्त चिंता करण्याची गरज नाही. फोनच्या बॅटरी आणि रॅमची माहिती अॅप्पल अधिकृतपणे देत नाही.