३० हजारांच्या आत iPhone 13 खरेदी करण्याची संधी; अशी आहे Flipkart वरील जबरदस्त ऑफर

दोन वर्ष जुना असून देखील iPhone 13 चा पिच्छा ग्राहक सोडत नाहीत. आयफोन १५ बाजारात उपलब्ध आहे तसेच आयफोन १४ देखील खरेदी करता येत आहे, तरीही ग्राहक आयफोन १३ ला पसंती देत आहेत. यामागील एक कारण म्हणजे डिजाइन मध्ये न झालेला बदल. हे तिन्ही फोन जवळपास एक सारखे दिसत असल्यामुळे ग्राहक यातील सर्वात स्वस्त मॉडेल निवडत असावे. त्यात आता फ्लिपकार्टनं आपल्या डीलची भर टाकली आहे.

iPhone 13 वरील फ्लिपकार्टची एक्सचेंज डील

सध्या आयफोन १३ चा १२८ जीबी स्टोरेज असलेलं मॉडेल फ्लिपकार्टवर ५२,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. परंतु जर तुम्ही आयफोन १३ (१२८जीबी) विकत घेण्यासाठी आयफोन १२ एक्सचेंज केल्यास तुम्हाला ३१,९५३ रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे हा फोन २८,०९७ रुपयांना सहज उपलब्ध होईल.
हे देखील वाचा: टायटेनियम नंतर आता Apple करणार सोन्याचा वापर? गोल्ड फिनिशसह येऊ शकतो iPhone 16 Pro

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन

iPhone 13 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्याचा मुख्य मेन कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. तसेच १२ मेगापिक्सलचा आणखी एक कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. चिपसेट म्हणून फोनमध्ये A15 Bionic चा वापर करण्यात आला आहे. जो कंपनीचा दमदार प्रोसेसर आहे.

आयफोन १६ सीरिजमध्ये गोल्ड कलर

गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन १५ सीरीजचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स टायटेनियम फ्रेम मध्ये सादर करण्यात आले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे युजर Majin Bu (@majinbuofficial) नं दोन डिजाइन शेयर केल्या आहेत, हे नवीन कलर्स मधील आयफोन १६ प्रो वाटत आहेत. कंपनीच्या नवीन प्रीमियम आयफोन मॉडेल्स Desert Titanium आणि Titanium Grey मध्ये लाँच केला जाऊ शकतो. नवीन डेजर्ट टायटेनियम (डेजर्ट येलो) कलर आयफोन १६ प्रो मॉडेल्स मधील गोल्ड कलर आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन १५ सीरीजचे प्रो मॉडेल्स गोल्ड फिनिशमध्ये उपलब्ध झाले नव्हते. टिप्सटरने दिलेली माहिती खरी ठरल्यास आयफोन १६ प्रो द्वारे कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये गोल्ड कलरचे पुनरागमन होऊ शकते.

Source link

iPhoneiPhone 13iphone 13 flipkart exchange offeriphone 13 flipkart offeriphone 13 specifications
Comments (0)
Add Comment